Cat Que Virus: कोविड-19 दरम्यान भारतामध्ये चीनमधील 'कॅट क्यू व्हायरस'मुळे नवा रोग पसरण्याची शक्यता; ICMR ने दिला इशारा 

काही देशांमध्ये या विषाणूची दुसरी लाट चालू आहे. आता कोविड-19 विरुद्ध भारतामध्ये सुरू असलेल्या लढाईदरम्यान, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) च्या शास्त्रज्ञांनी ‘कॅट क्यू व्हायरस' (Cat Que Virus- CQV) नावाचा आणखी एक विषाणू शोधून काढला आहे.

Virus | Representational Image| (Photo Credits: Pixabay)

सध्या संपूर्ण जगामध्ये कोरोना व्हायरसशी (Coronavirus) लढा चालू आहे. काही देशांमध्ये या विषाणूची दुसरी लाट चालू आहे. आता कोविड-19 विरुद्ध भारतामध्ये सुरू असलेल्या लढाईदरम्यान, इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (ICMR) च्या शास्त्रज्ञांनी ‘कॅट क्यू व्हायरस' (Cat Que Virus- CQV) नावाचा आणखी एक विषाणू शोधून काढला आहे. यामुळे देशात पुन्हा एका नव्या रोगाचा प्रसार होण्याची शक्यता आहे. आर्थ्रोपॉड-जनित  (Arthropod-Borne) विषाणूच्या श्रेणीत हा व्हायरस मोडत असून, डुकरांमध्ये व कुलेक्स डासांमध्ये आढळून आलेले सीक्यूव्ही मोठ्या प्रमाणात चीन आणि व्हिएतनाममध्ये आढळल्याचे नोंदवले गेले आहेत.

नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी (NIV), आयसीएमआर, पुणे च्या शास्त्रज्ञांनी चाचणी घेतलेल्या 883 मानवी सीरमपैकी दोन नमुन्यांमध्ये या व्हायरसची प्रतिपिंडे (Antibodies) शोधली आहेत. नमुन्यांच्या चाचणीत असेही दिसून आले आहे की, या दोन्ही लोकांना CQV लागण जवळजवळ एकाच वेळी झाली होती. 2014 आणि 2017 मध्ये कर्नाटकमधील हे दोन नमुने अँटी सीसीव्हीव्ही आयजीजी अँटीबॉडीजसाठी सकारात्मक असल्याचे आढळले होते.

लाइव्हमिंटच्या मते, आयसीएमआर शास्त्रज्ञांनी असे सांगितले की, वेक्टरची उपलब्धता, स्वाइन आणि जंगलातील मैना बर्डपासून सीक्यूव्हीची पुष्टी ही ऑर्थोबुनियाव्हायरसची संभाव्यता भारतातील सार्वजनिक आरोग्यासाठी हानिकारक आहे. आयसीएमआरने पुढे सांगितले की, मानवी सीरमच्या नमुन्यांमध्ये अँटी-सीक्यूव्ही आयजीजी प्रतिपिंडे यांची सकारात्मक चाचणी आली आहे. डासांमधील सीक्यूव्हीची क्षमता ही संभाव्य आजार असल्याचे दर्शविते ज्यामुळे, भारतात हा विषाणू ची संभाव्यता निर्माण होते.

हा व्हायरस डासांपासून वेगळा केला गेला, जो त्याचा नैसर्गिक स्त्रोत आहे. सीक्यूव्ही ट्रान्समिशनसाठी पक्षांची भूमिका आणि सीक्यूव्हीचे मानवी संक्रमणच्या अहवालाचे अद्याप दस्तऐवजीकरण केलेले नाही. या व्हायरसचा प्रसार डुक्करांच्या मार्फत झाल्याचे चीनमध्ये पाळल्या जाणार्‍या स्वाइनमध्ये या व्हायरसविरूद्ध अँटीबॉडीज  आढळले आहेत. (हेही वाचा: भारतात मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात- आरोग्य मंत्रालय)

दरम्यान, जानेवारी-फेब्रुवारीपासून जगामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग वाढायला सुरुवात झाली. आता इतक्या महिन्यांमध्ये अनेक देशांनी त्यावर काही प्रमाणात मात केली आहे, मात्र आता अनेक देशांमध्ये कोविड-19 साथीच्या दुसर्‍या लाटेचा सामना करावा लागत आहे. मात्र ब्रिटनमध्ये कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. युकेची युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्ग (University of Edinburgh), येथील संसर्ग रोगांचे प्राध्यापक मार्क वूलहाउस म्हणतात की, कोविड-19 ची तिसरी लाट येण्याची शक्यता आहे. ते पुढे असेही म्हणाले की, लॉकडाऊन मुळे हा विषाणू टळू शकतो मात्र तो संपू शकत नाही.