मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना खुनाची धमकी देणाऱ्या २० वर्षीय तरुणाला उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्सने दिलेल्या माहितीवरुन महाराष्ट्र पोलिसांनी नाशिक मध्ये अटक केली आहे. त्यांना गुन्हा काबुल केला असून त्याला आता यूपी एसटीएफच्या ताब्यात देण्यात आले आहे.
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजत आहे. याबाबत काँग्रेसचे नेते अर्जुन मोढवाडिया यांनी ट्विट च्या माध्यमातून माहिती दिली आहे. सविस्तर बातमीसाठी इथे क्लिक करा.
पुणे शहरात आज नव्याने 179 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असून एकूण संख्या 4782 झाली आहे. पुण्यात आजवर 77 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून सध्या 1977 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
दरवर्षी रमजान ईद हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र, कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर ईदचा सण असूनही दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी दिल्ली येथील दरियागंज बाजारात कमी लोक दिसून आले आहेत. यामुळे दिल्ली येथील दरियागंज येथील बाजारातील विक्रेत्यांना मोठा फटका बसला आहे. तसेच विक्रेत्यांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. एएनआयचे ट्वीट-
महाराष्ट्रातुन 7.38 लाख मजूर 527 ट्रेनने त्यांच्या राज्यात परतले. दररोज जास्तीत जास्त ट्रेनची केंद्राकडे मागणी करण्यात येत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून आतापर्यंत मजूरांच्या तिकिटांसाठी 85 कोटी देण्यात आलेत. राज्य शासन मजूरांना रेल्वेस्थानकावर सोडण्यास बस सेवा व जेवणाची व्यवस्था करत आहे. मजुरांच्या प्रकरणी करण्यात आलेल्या कामाचा महाराष्ट्र गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आढावा मांडला आहे.
उच्च शिक्षण व तंत्रज्ञान मंत्री उदय सामंत यांनी एका खा सव्हिडीओच्या माध्यमातून समस्त मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सण साजरा करताना काळजी घ्यावी असे आवाहनही सामनात यांनी केले आहे.
संपूर्ण देशाची चिंता वाढवणारे कोरोना व्हायरसचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे. देशातील कोरोना रुग्णांची वाढ कायम असून बळींचा आकडाही वाढताना दिसत आहे. तर कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही चांगले आहे. देशातील कोरोना बाधितांची संख्या 125101 इतकी झाली असून दिवसागणित ती वाढत आहे. दरम्यान कोरोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. तसंच लॉकडाऊनच्या चौथ्या टप्प्यात संपर्ण भारत देश आहे.
लॉकडाऊनमुळे निर्माण झालेल्या विविध समस्या सोडवण्याचे काम सध्या सुरु आहे. स्थलांतरीत मजूरांना इच्छित स्थळी पोहचवण्यात येत आहे. तर 25 मे पासून देशांतर्गत विमानसेवा सुरु होत आहे. विशेष म्हणजे 1 जून पासून 200 विशेष प्रवासी ट्रेन्स चालवण्यात येणार आहेत. नॉन रेड झोन मध्ये उद्योगधंदे सुरु झाले असून बेरोजगारांना मनरेगा अंतर्गत कामही देण्यात येत आहे.
आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या.
महाराष्ट्र राज्यातील विशेषतः मुंबईतील वाढती रुग्णसंख्या आणि पावसाळ्यात कोरोनाच्या संकटात गैरसोयींची भर पडू नये म्हणून विविध ठिकाणी क्वारंटाईन सेंटर्सची सोय करण्यात येत आहे. दरम्यान महाराष्ट्रात शैक्षणिक वर्ष 2020-21 दरम्यान शाळा 15 जूनपासून सुरु करण्याची योजना सरकार आखत आहे. मात्र कॉलेजबाबत अद्याप कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नाही. तसंच राज्यात 10 वी, 12 वी परीक्षांचे निकालही अजून लागायचे आहेत.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)