Close
Advertisement
 
बुधवार, जानेवारी 29, 2025
ताज्या बातम्या
3 hours ago

जलालाबादमधील कासारी गावात जमीन वादावरून दोन गटात झालेल्या चकमकी प्रकरणी दोघांना अटक; एक आरोपी फरार ; 16 डिसेंबर 2020 च्या ताज्या मराठी बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज LIVE

बातम्या Poonam Poyrekar | Dec 17, 2020 12:09 AM IST
A+
A-
17 Dec, 00:06 (IST)

जलालाबादमधील कासारी गावात जमीन वादावरून दोन गटात झालेल्या चकमकीत अनुसूचित जातीतील एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आणि 4 जण जखमी झाले. दोन जणांना अटक करण्यात आली असून एका फरार आरोपीला लवकरच अटक केली जाईल, असे शाहजहांपूरचे पोलिस अधीक्षक एस आनंद यांनी सांगितले.

16 Dec, 23:21 (IST)

Mangaluru: बजरंग दलाचे माजी नेते यांना अटक करण्यात आली आहे. गुरे चोरुन कत्तलखान्यांना विकल्याप्रकरणी कारवाई करण्यात आली.

16 Dec, 23:11 (IST)

बाबा रामसिंग यांना आमच्याकडे मृत आणण्यात आलं. त्यांनी डोक्यात गोळी झाडून घेतली होती. पोलिसांच्या तपासणीनंतर त्याचे कारण कळू शकेल. आम्ही त्याला मृत घोषित केले. त्याला पोस्टमार्टमसाठी करनाल येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, अशी माहिती पानिपत येथील पार्क हॉस्पिटल मधील डॉ. प्रदीप यांनी दिली.

16 Dec, 22:23 (IST)

Coronavirus in Maharashtra: राज्यात कोविड-19 चे 4,304 नवे रुग्ण आढळून आले असून 95 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 4,678 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे आज त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

एकूण रुग्णसंख्या: 18,80,893

कोरोनावर मात केलेल्यांची संख्या: 17,69,897

मृतांचा आकडा: 48,434

सक्रीय रुग्णसंख्या: 61,454

16 Dec, 21:43 (IST)

Odisha: 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धाच्या 50 व्या वर्धापन दिनानिमित्त भुवनेश्वरमधील 120 बटालियन बिहार कलिंग वॉरियर्स वॉर स्मारकात शहीदांना श्रद्धांजली अर्पण

16 Dec, 21:13 (IST)

Jammu and Kashmir: राजौरीच्या नौशेरा सेक्टरमध्ये पाकिस्तानकडून युद्धबंदीचे उल्लंघन करण्यात आले. आज सायंकाळी 6 वाजता झालेल्या घटनेनंतर  भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे.

16 Dec, 20:41 (IST)

कुलाबा-सिप्झ मुंबई मेट्रोच्या लाईन 3चे  काम पूर्ण झाल्याची माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड यांनी दिली आहे.

16 Dec, 20:13 (IST)

केरळात कोरोनाचे आणखी 6185 रुग्ण आढळले असून 5728 जणांची प्रकृती सुधारली  आहे.

16 Dec, 19:57 (IST)

दिल्ली: कृषी कायद्याच्या विरोधात गाझीपूर येथे शेतकऱ्यांकडून आंदोलन सुरुच  आहे.

16 Dec, 19:45 (IST)

दिल्ली गुन्हे शाखेकडून आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरवर छापेमारी करत 54 जणांचा अटक करण्यात आली आहे.

Load More

भारतीय सेनेने 16 डिसेंबर 1971 रोजी पाकिस्तानवर ऐतिहासिक विजय मिळविल्याने हा दिवस संपूर्ण देशभरात 'विजय दिवस' (Vijay Diwas) म्हणून साजरा केला जातो. भारताच्या इतिहासात सुवर्णअक्षरांनी लिहून ठेवावा असा हा दिवस आहे. या युद्धात ज्या जवानांनी आपल्या प्राणांची आहुती त्या शहीदांना देखील श्रद्धांजली दिली जाते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी देखील ट्विटच्या माध्यमातून सर्वांना विजय दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. भारतीय सेनेने 1971 मध्ये आजच्याच दिवशी ऐतिहासिक विजय मिळवला. त्यांच्या साहसाची आणि पराक्रमाची आठवण म्हणून हा दिवस साजरा केला जातो. अशा या महान दिनाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा असे अमित शाह यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

तर दुसरीकडे आज संपूर्ण देशाला हादरवून टाकणारे निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरण याच दिवशी घडले होते. या घटनेला आज 8 वर्षे झाली. आमच्या मुलीला न्याय मिळाला पण तो न्याय मिळवण्यासाठी आम्हाला 8 वर्षे वाट पाहावी लागली अशी प्रतिक्रिया निर्भयाच्या आईने दिली आहे.

आजच्या दिवसभरातील मुंबई, पुणे, नाशिक सह देशा-परदेशातील महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी लेटेस्टली मराठी ला नक्की भेट द्या. 

दरम्यान महाराष्ट्रात 3442 नव्या रुग्णांसह राज्यात कोरोना बाधितांची एकूण संख्या 18 लाख 86 हजार 807 वर पोहोचली आहे. तर मृतांची एकूण संख्या 48,339 वर पोहोचली आहे.


Show Full Article Share Now