Maha Shivratri 2020: पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मान्यवरांनी दिल्या महाशिवरात्रीच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा!
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह मान्यवरांनी आज ट्विटरच्या माध्यमातून भगवान शंकराच्या भाविकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्रासह देशभरात आज (21 फेब्रुवारी) महाशिवरात्रीचा (Maha Shivratri) उत्सव साजरा केला जात आहे. हिंदू धर्मीयांच्या मान्यतेनुसार, भगवान शंकराला देवांचा देव आणि सृष्टीचा पालनकर्ता समजलं जातं. त्यामुळे आज माघ वद्य चतुर्दशी दिवशी महाशिवरात्रीचं औचित्य साधत साजरा केल्या महाशिवरात्रीनिमित्त भगवान शंकराच्या मंदिरा बाहेर भाविकांची लांबच लांब रांग पहायला मिळत आहे. यासोबतच डिजिटल मीडियाच्या माध्यमातून सोशल मीडीयातूनही भाविक महाशिवरात्रीच्या शुभेच्छा देत आहेत. दरम्यान भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांच्यासह मान्यवरांनी आज ट्विटरच्या माध्यमातून भगवान शंकराच्या भाविकांना महाशिवरात्रीच्या मंगलमय पर्वाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. महाशिवरात्र म्हणजे भगवान शंकराची आराधना करण्यासाठीचा मोठा दिवस. त्यामुळे या दिवसाचं औचित्य साधून अनेक भाविक आपल्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान शंकराच्या मंदिरामध्ये गर्दी करतात. आजही मुंबईच्या बाबुलनाथ मंदिरापासून वाराणसीच्या काशी विश्वेश्वर मंदिरापर्यंत भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
यंदा महाशिवरात्र खास असण्याचं अजून एक कारण म्हणजे 59 वर्षांनी जुळून आलेला 'शश योग'. या दिवशी शनि आणि चंद्र मकर राशी, गुरु धनु राशीत, बुध कुंभ राशीत आणि शुक्र मीन राशीत राहणार आहेत. त्यामुळे हा योग सिद्धी आणि साधना करणार्यांसाठी खास आहे. Happy Maha Shivratri 2020 Images: महाशिवरात्र निमित्त मराठमोळी HD Greetings, Wallpapers, Wishes शेअर करुन द्या शिवभक्तांना पावन पर्वाच्या शुभेच्छा!
नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा
रामनाथ कोविंद यांच्या शुभेच्छा
राहुल गांधी यांचे ट्वीट
देवेंद्र फडणवीस यांचे ट्विट
सुप्रिया सुळे ट्वीट
सुरेश प्रभू यांचे ट्वीट
महाशिवरात्रीचा उत्सव हा शिवभक्तांसाठी खास असतो. आजच्या दिवशी मनोकामना पूर्ण करण्यासाठी भाविक शंकर मंदिरात जाऊन भोलेनाथाची पूजा करतात. भगवान शंकराला प्रिय असणार्या दूध, पाण्याचा अभिषेक केला जातो. सोबतच बेलपत्र अर्पण केले जातात. दरम्यान भगवान शंकर देवांचा देव असून त्याला सृष्टीचा संरक्षणकर्ता समजलं जातं.