PMSYM: प्रतीमहिना 55 रुपये गुंतवा, सेवानिवृत्तीनंतर 36 हजार रुपयांपर्यंत पेन्शन मिळवा

त्यासाठी सबंधीत व्यक्ती आणि सरकार दोघे मिळून ठरावीक रक्कम गुंतवतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी संबंधीत व्यक्तीजवळ सरकारी बँकेत बचत खाते आणि स्वत:चे आधार कार्ड असणे अतिशय गरजेचे आहे.

(File Photo))

अर्थमंत्री निर्मला सीतारमण ( Nirmala Sitharaman) यांनी 2019-20 या आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प संसदेत नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पात सीतारमण यांनी प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना (Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana) अंतर्गत सुमारे 3 कोटी किरकोळ व्यापारी (Retail Businessmen) आणि मोठ्या व्यापाऱ्यांना सहभागी करुन घेण्याचे अश्वासन दिले. हे आश्वासन देताना त्यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत छोट्या उद्योजकांना निवृत्तीनंतर पेन्शन देण्यात येईल. जाणन घेऊया काय आहे, Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana.

कोणाला मिळू शकतो PMSYM योजनेचा लाभ?

प्रधान मंत्री श्रम योगी मानधन योजना ही प्रामुख्याने असंगठीत क्षेत्रासाठी आहे. या योजनेच्या माध्यमातून सरकारकडून पेन्शनी गॅरेंटी मिळते. असंगठीत क्षेत्राशी संबंधीत कोणताही कामगार ज्याचे वय 40 वर्षांपेक्षा कमी असेल तसेच, जो इतर सरकारी योजनेचा फायदा घेत नसेल असा व्यक्ती या योजनेचा फायदा मिळवू शकतो. असंगठित क्षेत्राशी संबंधीत कामगार जसेकी घरकाम करणाऱ्या महिला, नोकर, चालक, रिक्षाचालक, बांधकाम मजूर, कचरावेचक कामगार, विडी कामगार अशा लोकांना याचा फायदा मिळू शकतो. (हेही वाचा, डिजिटल बँकिंगला केंद्र सरकारचे प्रोत्साहन, यापुढे वर्षाला दहा लाखाची रक्कम काढल्यास भरावा लागणार कर)

प्रती महिना 3 हजार रुपये मिळवा

Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana अंतर्गत सरकार 3 हजार रुपये पेन्शन देऊ करते. त्यासाठी सबंधीत व्यक्ती आणि सरकार दोघे मिळून ठरावीक रक्कम गुंतवतात. या योजनेचा लाभ घेण्यासाठी गुंतवणूक करण्यासाठी संबंधीत व्यक्तीजवळ सरकारी बँकेत बचत खाते आणि स्वत:चे आधार कार्ड असणे अतिशय गरजेचे आहे. तसेच या व्यक्तिचे वय हे 18 वर्षे पूर्ण आणि 40 वर्षांपेक्षा कमी असायला हवे.

प्रती महिना किती गुंतवाल?

जर आपले वय हे 18 वर्षांहून अधिक असेल तर आपण या योजनेसाठी पात्र आहात. आपल्याला Pradhan Mantri Shram Yogi Mandhan Yojana साठी प्रती महिना 55 रुपये म्हणजेच वर्षाकाटी 660 रुपये गुंतवावे लागतील. आपल्या वयाची 60 वर्षे पूर्ण होताच आपल्याला निवृत्तीवेतन म्हणजेच पेन्शन सुरु होईल.