Western Coalfield Recruitment 2021: स्टाफ नर्स ट्रेनी पदासाठी नोकर भरती, westerncoal.in वर करता येईल अर्ज

जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स ट्रेनीच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे.

Representational Image (Photo Credits: File Photo)

Western Coalfield Recruitment 2021: जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर ही तुमच्यासाठी महत्वाची बातमी आहे. कारण वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड मध्ये स्टाफ नर्स ट्रेनीच्या पदासाठी नोकर भरती करण्यात येणार आहे. त्यामुळे नोकरीसाठी अर्ज करण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांनी वेस्टर्न कोल्डफील्ड्स लिमिटेडची अधिकृत संकेतस्थळ westerncoal.in येथे भेट द्यावी.(NABCONS Recruitment 2021: नाबार्डच्या 'या' कंपनीत 22 रिक्त पदांसाठी नोकर भरती, 1.5 लाख रुपये वेतन मिळणार)

या नोकर भरतीसाठी अर्ज करण्यासाठी सुरुवात 13 मे पासून झाली आहे. तर अर्ज करण्याची अंतिम तारीख 27 मे 2021 रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत असणार आहे. स्टाफ नर्स ट्रेनीच्या पदावर अर्ज करण्यासाठी काही नियम आणि अटी सुद्धा लागू करण्यात आल्या आहेत. तर स्टाफ नर्स (ट्रेनी) टी अॅन्ड एस ग्रेड सी पदासाठी 56 योग्य उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

टी अॅन्ड एस ग्रेड सी साठी सुरुवातीला वेतन 31,852.56 रुपये प्रति महिना असणार आहे. या व्यतिरिक्त त्यांना डीए आणि वेतन नुसार भत्ता आणि सुविधेसाठी सुद्धा पात्र आहे. यासाठी उमेदवारांना 12 वी पास असावे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त संस्थेतून 'ए' ग्रेड नर्सिंग डिप्लोमा/सर्टिफिकेट केलेले असावे. उमेदवाराचे वय 18 ते 30 वर्ष असावे. (BEL Recruitment 2021: भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिडेटमध्ये ट्रेनी इंजिनियरच्या 40 पदांसाठी नोकर भरती,  21 मे पर्यंत करता येणार अर्ज)

निवड प्रक्रिया 100 गुणांच्या परिक्षेसह कागदपत्रांचे वेरिफिकेशन केल्यानंतरच निवड होणार आहे.त्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्र recruitmentir.wcl@coalindia.com/ येथे ईमेलच्या माध्यमातून पाठवावीत. अर्ज करण्याची अंतिम ताराखी 27 मे आहे.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement