ISRO: इस्त्रोची यशस्वी झेप! PSLV-C49 च्या माध्यमातून केले 10 उपग्रहांचे प्रक्षेपण
आज शनिवारी (7 ऑक्टोबर 2020) दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 च्या माध्यमातून 10 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. हे लाँचिंग दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार होते. मात्र, यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी लाँचिंग झाले.
भारतीय अंतराळ संशोधन संस्था इस्त्रोने (ISRO) पुन्हा एकदा अंतराळ क्षेत्रात आपल्या यशाचा नवा टप्पा गाठला आहे. आज शनिवारी (7 ऑक्टोबर 2020) दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी PSLV-C49 च्या माध्यमातून 10 उपग्रहांचे प्रक्षेपण केले आहे. हे लाँचिंग दुपारी 3 वाजून 2 मिनिटांनी होणार होते. मात्र, यात सुधारणा करुन 3 वाजून 12 मिनिटांनी लाँचिंग झाले. श्रीहरीकोटामधील (Sriharikota) सतीश धवन स्पेस सेंटरमधून (Satish Dhawan Space Centre) झालेल्या प्रक्षेपणात 9 आंतराष्ट्रीय तर एक भारतीय सॅटेलाइट सोडण्यात आले. भारताचे अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट EOS-01 चे यशस्वीपणे लॉन्च झाल्याची माहिती इस्त्रोचे प्रमुख के. सिवन यांनी दिली आहे. भारताची ही मोहिम अंतराळ क्षेत्रातील मोठे यश मानले जात आहे.
इस्रोचा हा 51 वा मिशन आहे. PSLVC49 चे यशस्वी प्रक्षेपण झाल्यानंतर सुरुवातीला EOS01 हा उपग्रह चौथ्या टप्प्यात यशस्वीपणे क्षेपणास्त्रापासून वेगळा झाला आणि अंतराळ कक्षेत यशस्वीपणे सोडण्यात आला. यानंतर टप्प्याटप्प्याने इतर 9 उपग्रह देखील यशस्वीपणे वेगळे होऊन आपआपल्या कक्षेत स्थिरावले. अशाप्रकारे या मोहिमेत इस्रोचा एक आणि अन्य 9 अशा एकूण 10 उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण झाले आहे. कोरोनाचे संकट असताना हे करणे खूप कठीण होते. कोरोनाच्या काळात यशस्वीपणे कामगिरी केल्याबद्दल के. सिवन यांनी सर्व शास्त्रज्ञांचे कौतूक केले आहे. हे देखील वाचा- Rafale Fighter Jets: भारतीय वायुदलाचे बळ वाढले; राफेल लढाऊ विमानांची दुसरी तुकडी भारतात दाखल
इस्त्रोचे ट्विट-
पीएसएलव्ही प्राथमिक उपग्रह EOS01 घेऊन जात आहे. हा रडार इमेजिंग उपग्रह (आरआयएसएटी) आहे. हा एक प्रगत रीसेट आहे ज्याचा सिन्थॅटिक अपरचर रेडार ढगांच्या पलीकडे देखील पाहू शकतो. दिवस असो किंवा रात्र असो, एवढेच नव्हेतर हवामान काहीही असो, ते सर्व वेळी प्रभावी सिद्ध होईल. हे केवळ लष्करी पाळत ठेवण्यातच मदत करणार नाही तर शेती, वनीकरण, मातीतील आर्द्रता मोजण्यासाठी भूगर्भशास्त्र आणि किनारपट्टीचे निरीक्षण करण्यासही उपयुक्त ठरणार आहेत.