SC On Delhi Coaching Centre Tragedy: कोचिंग सेंटर्स मुलांच्या जीवाशी खेळत आहेत; सर्वोच्च न्यायालयाने बजावली केंद्र आणि दिल्ली सरकारला नोटीस
कोचिंग सेंटर्स देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे.
SC On Delhi Coaching Centre Tragedy: सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) सोमवारी दिल्लीतील राव कोचिंग सेंटर (Coaching Centre) मध्ये घडलेल्या तीन IAS उमेदवारांच्या मृत्यूची दखल घेतली असून या घटनेला 'डोळे उघडवणारी' घटना असं म्हटलं आहे. याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने स्वत:हून दखल घेत केंद्र सरकार (Central Government) आणि दिल्ली सरकार (Delhi Government) ला नोटीस बजावली आहे. कोचिंग सेंटर मुलांच्या जीवाशी खेळत आहेत. कोचिंग सेंटर्स डेथ चेंबर बनत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. तसेच न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांनी अशा घटना कमी करण्यासाठी आतापर्यंत कोणती पावले उचलली आहेत? याची माहिती देण्यास सांगितले आहे. (हेही वाचा - Delhi Coaching Centre Deaths: दिल्ली कोचिंग दुर्घटनेची गृहमंत्रालयाची समिती करणार चौकशी, 30 दिवसांत अहवाल सादर करणार)
न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने सांगितले की, 'दिल्लीच्या एनसीटी किंवा भारतीय संघाने आतापर्यंत कोणती प्रभावी उपाययोजना केली आहे याबद्दल आम्हाला खात्री नाही. अलीकडील दुर्दैवी घटनांमुळे कोचिंगमधील काही तरुणांचे प्राण गेले. ही घटना सर्वांसाठी डोळे उघडवणारी आहे.' (हेही वाचा -Delhi IAS Coaching Center Tragedy: दिल्ली कोचिंग सेंटर दुर्घटनेप्रकरणी SUV चालक Manuj Kathuria ला जामीन मंजूर)
सुप्रीम कोर्टाने सांगितले की, ही घटना डोळे उघडणारी आहे की कोणत्याही संस्थेने सुरक्षिततेचे नियम पाळल्याशिवाय त्यांना चालवण्याची परवानगी दिली जाऊ नये. कोचिंग सेंटर्स देशाच्या विविध भागांतून येणाऱ्या उमेदवारांच्या जीवाशी खेळत असल्याचे कोर्टाने म्हटले आहे. राजधानी दिल्लीतील राजेंद्र नगर येथील राव कोचिंग सेंटरच्या तळघरात पावसाचे पाणी तुंबल्याने तीन आयएएस उमेदवारांचा मृत्यू झाला होता. 27 जुलै रोजी ही घटना घडली होती. (Delhi IAS Coaching Center Tragedy: आयएएस कोचिंग दुर्घटनेनंतर दिल्लीत विद्यार्थ्यांनी काढली कँडल मार्च; सरकारकडे केली 'ही' मागणी)
दरम्यान, राजधानी दिल्लीतील जुन्या राजेंद्र नगरमधील कोचिंग इन्स्टिट्यूटबाहेर विद्यार्थ्यांचे निदर्शन सोमवारी दहाव्या दिवशीही सुरूच आहे. कोचिंग इन्स्टिट्यूटच्या तळघरात पाणी साचल्यामुळे तीन यूपीएससी परीक्षार्थींच्या दुःखद मृत्यूबद्दल विद्यार्थ्यांनी सरकार आणि राव यांच्या आयएएस स्टडी सर्कलकडे नुकसान भरपाईची मागणी केली आहे. ANI वृत्तसंस्थेशी बोलताना आकांक्षा या विद्यार्थिनीने सांगितले की, आंदोलनाचा हा 10 वा दिवस आहे आणि विद्यार्थी सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून 'नुक्कड नाटक' (रस्त्यावर निदर्शने) च्या रूपाने निषेधाचे नवीन स्वरूप सुरू करतील.