Taarak Mehta फेम Munmun Dutta करतेय वयाने 9 वर्ष कमी असलेल्या अभिनेत्याला डेट, नाव ऐकून व्हाल हैराण

हा अभिनेता कोणत्याही दुसऱ्या शो किंवा सिनेमातील नव्हे तर तारक मेहता मधील फेम अभिनेताच आहे.

Munmun Dutta Instagram (Photo Credits: Instagram )

'तारक मेहता' (Taarak Mehta) फेम 'बबीता जी' (Babita Ji) म्हणजेच मुनमुन दत्ता (Munmun Dutta)  हिच्या बद्दल जोरदार चर्चा सुरु झाल्या आहेत. तर मुनमुन दत्ता ही काही महिन्यांपासून शो पासून दूर होती. त्यानंतर आता तिने पुन्हा शो मध्ये एन्ट्री केली आहे. अशातच एक खळबळजनक बाब समोर आल्याने ती तुम्ही ऐकाल तर तुम्हाला सुद्धा विश्वास बसणार नाही. तर मुनमुन दत्ता ही तिच्या वयापेक्षा 9 वर्षाने कमी वय असलेल्या अभिनेत्याला डेट करत आहे. हा अभिनेता कोणत्याही दुसऱ्या शो किंवा सिनेमातील नव्हे तर तारक मेहता मधील फेम अभिनेताच आहे.

ईटाइम्स मध्ये छापून आलेल्या बातमीनुसार, मुनमुन दत्ता ज्या अभिनेत्याला डेट करतेय त्याचे नाव राज अनादकत (Raj  Anadkat) असे आहे. हा राज नेमका कोण तर जेठालाल याच्या काळजाचा तुकडा टप्पू आहे. असा दावा करण्यात आला आहे की, दोघे सध्या रिलेशनशिप मध्ये आहेत. त्याचसोबत मुनमुन हिच्या इंस्टाग्रामवरील कमेंट्सवरुन आता युजर्सकडून त्यांच्या नात्याबद्दल चर्चा सुरु झाल्या आहे.(Urvashi Rautela हिने ट्रायल रुममधील व्हिडिओ शेअर केल्याने युजर्सकडून संताप व्यक्त)

 

View this post on Instagram

 

A post shared by 𝐌𝐔𝐍𝐌𝐔𝐍 𝐃𝐔𝐓𝐓𝐀 🧚🏻‍♀️🦋 (@mmoonstar)

 

View this post on Instagram

 

A post shared by Raj Anadkat (@raj_anadkat)

तारक मेहता शो मधील सर्वांना याबद्दल माहिती आहे की, त्या दोघांमध्ये नेमके काय सुरु आहे. या प्रकरणासंबंधित एका सुत्राने म्हटले की, मुनमुन दत्ता आणि राज याच्या परिवाराला सुद्धा त्यांच्या नात्याबद्दल माहिती आहे. तसेच दोघेजण एकमेकांना काही काळापासून डेट करत आहे. तर मुनमुन आणि राज यांच्या रिलेशनशिपच्या चर्चेमुळे आता सर्वांच्याा भुवया उंचावल्या गेल्या आहेत.