Anandi Gopal Trailer: गोपाळराव आणि डॉ.आनंदीबाई जोशी या सामान्य जोडीचा असामान्य प्रवास उलगडणार 'आनंदी गोपाळ',पहा दिमाखदार ट्रेलर
ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) आणि भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) यांच्या मुख्य भूमिकेतील 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे.
Anandi Gopal Trailer: ललित प्रभाकर ( Lalit Prabhakar) आणि भाग्यश्री मिलिंद (Bhagyashree Milind) यांच्या मुख्य भूमिकेतील 'आनंदी गोपाळ' (Anandi Gopal) या आगामी मराठी सिनेमाचा ट्रेलर आज लॉन्च करण्यात आला आहे. आनंदीबाई ते डॉ. आनंदीबाई जोशी (Dr. Anandibai Joshi) हा प्रवास सिनेमातून रसिकांच्या समोर ठेवण्यात येणार आहे. डॉ. आनंदीबाई जोशी या भारतातील पहिल्या महिला डॉक्टर (India's First Female Doctor) आहेत. रूढीवादी समाजाच्या विरोधात जाऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारणं ते अगदी त्यांच्या आयुष्यातील डॉक्टराकीचं शिक्षण घेण्यासाठी परदेशात जाण्याचा निर्णय त्या का घेतात? त्यांच्या आयुष्यात नेमकं असं काय घडतं? हा जीवनप्रवास सिनेमाच्या माध्यमातून उलगडला जाणार आहे.
झी स्टुडिओ प्रस्तुत 'आनंदी गोपाळ' या सिनेमात अभिनेता ललित प्रभाकर गोपाळरावांची भूमिका साकारत आहे तर आनंदीबाईंच्या भूमिकेत भाग्यश्री मिलिंद झळकणार आहे. या सिनेमाचा टीझर आणि गाणी देखील रसिकांची वाहवा मिळवत आहे. 15 फेब्रुवारी 2019 रोजी हा सिनेमा रसिकांच्या भेटीला येणार आहे. 'आनंदी गोपाळ' सिनेमाच्या टीझर वरून बनवलेले धम्माल Memes सोशल मीडियावर व्हायरल!
आनंदीबाई आणि गोपाळराव जोशी यांच्या सहजीवनाचा प्रवास सुमारे 132 वर्षांपूर्वीचा आहे. गोपाळराव जोशी यांचा मुलींनी शिक्षण घेण्यावर आणि इंग्रजी शिकण्यावर भर होता.त्यासाठी त्यांना समाजाचा रोष पत्कारावा लागला. मात्र या सार्या दिव्यातून बाहेर पडून भारताची पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी कशी घडली हे पाहणं प्रेरणादायी आहे.