लगीन घाई.. कॉमेडीयन Deepak Kalal अडकणार 'या' अभिनेत्रीसोबत विवाहबंधनात

तर या अभिनेत्रीसोबत दीपक कलाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

कॉमेडीयन दीपक कलाल (फोटो सौजन्य- इंन्स्टाग्राम)

सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचे वारे वाहू लागले आहेत. तर प्रियांका चोप्रा-निक जोनस(Priyanka Chopra-Nick Jonas) यांचे लग्न येत्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यात अजून एक भर पडली आहे ती म्हणजे कॉमेडीयन दिपक कलाल (Deepak Kalal) याच्या लगीन घाईची. या लग्नसोहळ्याची दिपक कलाल याने त्याच्या इंन्स्टाग्रामवरुन लग्नपत्रिकासुद्धा पोस्ट केली आहे. तर या अभिनेत्रीसोबत दीपक कलाल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे.

कॉमेडीयन दिपक कलाल याने त्याच्या इंन्स्टाग्रावर (Instagram) नुकतीच लग्नपत्रिका पोस्ट केली आहे. तर आयटम गर्ल म्हणून ओळख असणाऱ्या राखी सावंत (Rakhi Sawant) सोबत येत्या 31 डिसेंबर रोजी विवाहबंधनात अडकणार आहे. तसेच या दोघांचा लग्नसोहळा लॉस एंजलिस येथे पार पडणार असल्याचे लग्नपत्रिकेत(Wedding Card) लिहिले आहे. प्रत्येक वेळी बोल्ड आणि आपल्या हटके अंदाजाने नेहमीच प्रेक्षकांच्या चर्चेत राहणारी राखी लवकरच या लग्नाच्या जोड्यामध्ये दिसून येणार आहे. तर दीपकने इंन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ पोस्ट करुन त्यात आपण लग्नानंतर एकत्र बिग बॉस-13, नच बलिये अशा विविध रियालिटी शो मध्ये सहभाग घेऊ असे दीपकने म्हटले आहे.

 

View this post on Instagram

 

We Invite You to join You On Our Wedding... @deepakkalalofficial Weds @rakhisawant2511

A post shared by Deepak Kalal (@deepakkalalofficial) on

तर खरच राखी सावंत दीपक कलालशी लग्न करणार का? की फक्त प्रेक्षकांपर्यंत पोहचण्यासाठी हे लग्न असणार असल्याच्या शंका बाळगल्या जात आहेत. तसेच राखीचे हे लग्न किती काळ टिकते हे पाहण्याजोगे असणार आहे.