लवकरच अभिनेता Vijay Deverakonda आणि अभिनेत्री Rashmika Mandanna अडकणार विवाहबंधनात? फेब्रुवारीमध्ये साखरपुडा होण्याची शक्यता

दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर येत आहेत.

Vijay Deverakonda, Rashmika (संग्रहित संपादित प्रतिमा)

Vijay Deverakonda and Rashmika Mandanna to Get Engaged? अभिनेत्रा रश्मिका मंदान्ना (Rashmika Mandanna) आपल्या अभिनय कौशल्याने साऊथपासून बॉलीवूडपर्यंत छाप सोडत आहे. सध्या ती तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या अॅनिमल चित्रपटामुळे चर्चेत आहे. रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा (Vijay Deverakonda) डेट करत असल्याच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत आहेत. मात्र, या दोघांनी कधीही आपले नाते अधिकृतपणे मान्य केले नाही. मात्र आता दोघांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत काही अहवाल समोर येत आहेत. रिपोर्ट्सनुसार, दोघेही फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात साखरपुडा करू शकतात. मात्र, रश्मिका मंदान्ना किंवा विजय देवरकोंडा या दोघांनीही यावर भाष्य केलेले नाही.

रश्मिका मंदान्नाचे नाव साऊथ स्टार विजय देवरकोंडासोबत बऱ्याच दिवसांपासून जोडले जात आहे. दोघेही अनेकदा एकत्र स्पॉट झाले आहेत. आता दोघांच्या साखरपुड्याच्या बातम्या समोर येत आहेत. विजय देवरकोंडा आणि रश्मिका मंदान्ना यांनी 'गीता गोविंदम' आणि 'डियर कॉम्रेड' या दोन चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. यानंतर हे दोघेही बऱ्याच दिवसांपासून रिलेशनशिपमध्ये असल्याच्या बातम्या अनेक ठिकाणी आल्या.

नुकतेच, रश्मिकाने विजय देवरकोंडा यांच्या हैदराबाद येथील घरी एकत्र दिवाळी साजरी केली. दोघेही एकत्र व्हेकेशनवर जाताना दिसले होते. दरम्यान, रश्मिका मंदान्ना याआधी साऊथचा प्रसिद्ध स्टार रक्षित शेट्टीसोबत रिलेशनशिपमध्ये होती. अभिनेत्रीने त्याच्याशी एंगेजमेंटही केली. पण काही कारणास्तव त्यांचे नाते लग्नापर्यंत पोहोचू शकले नाही आणि दोघांचे ब्रेकअप झाले. (हेही वाचा: Kangana Ranaut On Animal: कंगना रनौतचीही 'अ‍ॅनिमल'वर टिका, म्हणाली, 'महिलांची मारहाण पाहायला सिनेप्रेक्षकांना आवडते')

आजकाल विजय अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द रुल' या चित्रपटाचे शूटिंग करत आहे. याशिवाय त्याचे 'रेनबो', 'द गर्लफ्रेंड' आणि 'चावा' हे चित्रपटही निर्मितीच्या वेगवेगळ्या टप्प्यात आहेत. विजय देवरकोंडा पुढे परशुराम पेटलाच्या 'फॅमिली स्टार' आणि दिग्दर्शक गौतम तिन्ननुरीच्या 'व्हीडी 12' मध्ये दिसणार आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif