Natasha Dalal Pregnant: वरुण धवन आणि नताशा होणार आई-बाबा; फोटो शेअर करून चाहत्यांना दिली गोड बातमी

आता या यादीत आणखी एका बॉलिवूड कपलचा समावेश झाला आहे. अभिनेता वरुण धवन आणि त्याची पत्नी नताशा दलाल थोड्याच दिवसात आई-बाबा होणार आहेत.

Varun Dhawan, Natasha Dalal (PC - Instagram)

Natasha Dalal Pregnant: यंदा अनेक कलाकार लग्नबंधनात अडकले आहेत. तर दुसरीकडे, अनेक सेलेब्सच्या घरी नवा पाहूणा येणार आहे. अलीकडेच अभिनेता अली फजल आणि अभिनेत्री रिचा चढ्ढा यांनी चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी शेअर केली होती. आता या यादीत आणखी एका बॉलिवूड कपलचा समावेश झाला आहे. अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि त्याची पत्नी नताशा दलाल (Natasha Dalal) थोड्याच दिवसात आई-बाबा होणार आहेत. होय, हे जोडपे लवकरच पालक होणार आहे. खुद्द अभिनेत्याने ही माहिती सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

वडील झाल्याची बातमी वरुण धवनने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. वरुणने एक अतिशय सुंदर फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये तो गुडघ्यावर बसून पत्नी नताशा दलालच्या बेबी बंपला किस करताना दिसत आहे. त्याने फोटो शेअर करताना कॅप्शन लिहिले आहे की, 'आम्ही गरोदर आहोत... तुमच्या सर्वांच्या आशीर्वाद आणि प्रेमाची गरज आहे.'(हेही वाचा - Richa Chadha Pregnancy: रिचा चढ्ढा आणि अली फजल यांच्या घरी येणार छोटा पाहुणा; जोडप्याने अनोख्या पद्धतीने शेअर केली आनंदाची बातमी)

या पोस्टवर चाहते आणि सेलिब्रिटी अभिनेत्याचे अभिनंदन करताना दिसत आहेत. अभिनेता अर्जुन कपूरने लिहिले, डॅडी आणि मम्मी नंबर 1. मलायका अरोराने लिहिले, अभिनंदन. क्रिती सेनन आणि जान्हवी कपूर यांनी अनेक काळ्या रंगाचे हार्ट इमोजी पाठवले आहेत. सोनम कपूरने लिहिले, अरे देवा. नेहा धुपियाने लिहिले, तुमचे अभिनंदन. (हेही वाचा -Yami Gautam Pregnant: यामी गौतम होणार आई; लग्नाच्या 3 वर्षांनंतर अभिनेत्रीने चाहत्यांना दिली गुड न्यूज!)

 

View this post on Instagram

 

A post shared by VarunDhawan (@varundvn)

तीन वर्षांपूर्वी झाले होते लग्न -

वरुण आणि नताशाने 24 जानेवारीला लग्नाचा तिसरा वाढदिवस साजरा केला. या जोडप्याने 2021 मध्ये मुंबईपासून दूर असलेल्या अलिबागमध्ये कुटुंब आणि मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले. या जोडप्याच्या प्रेमकथेबद्दल बोलायचे झाले तर दोघेही एकमेकांना लहानपणापासून ओळखतात. वरुणने नताशाला 4 वेळा प्रपोज केले आणि नताशाने त्याला अनेकवेळा नकार दिला, पण अभिनेत्यानेही हार मानली नाही. शेवटी नताशाने वरुणचे प्रेम समजून होकार दिला.