Amitabh Bachchan Buys Mercedes: बच्चन कुटुंबाने खरेदी केली आणखी एक मर्सिडीज; पहा नवीन कारचा व्हायरल व्हिडिओ
Amitabh Bachchan Buys Mercedes: बच्चन कुटुंबियांनी दोन आठवड्यांपूर्वी मर्सिडीज (Mercedes) कार खरेदी केली होती. आता पुन्हा एकदा बच्चन कुटुंबियांनी मर्सिडीज खरेदी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं आहे.
Amitabh Bachchan Buys Mercedes: बच्चन कुटुंबियांनी दोन आठवड्यांपूर्वी मर्सिडीज (Mercedes) कार खरेदी केली होती. आता पुन्हा एकदा बच्चन कुटुंबियांनी मर्सिडीज खरेदी केली आहे. सध्या सोशल मीडियावर या कारचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून नेटीझन्सनी अमिताभ बच्चन यांना ट्रोल केलं आहे.
दरम्यान, व्हायरल भयानी यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांच्या कुटुंबातील नव्या कारचा व्हिडीओ शेअर केला आहे. प्राप्त माहितीनुसार ही मर्सिडीज बेंझ जीएलएस 2020 (Mercedes-Benz GLS 2020) गाडी आहे. ही कार याच वर्षी भारतात लाँच करण्यात आली होती. (हेही वाचा -Sushant Singh Rajput Wax Statue: पश्चिम बंगालमध्ये दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत चा पहिला मेणाचा पुतळा तयार)
View this post on Instagram
Time for upgrade Big B's new wheels 🔥 #viralbhayani @viralbhayani
A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on
बच्चन कुटुंबियांनी खरेदी केलेली ही कार 99.90 लाख रुपये आहे. याशिवाय अमिताभ बच्चन यांनी दोन आठवड्यांपूर्वी एक महागडी कार खरेदी केली होती. दरम्यान, महिनाभराच्या काळावधीमध्ये बच्चन कुटुंबियांनी दोन महागड्या कार खरेदी केल्याने नेटीझन्सनी अमिताभ यांच्यावर टीका केली आहे. अमिताभ बच्चन यांच्यासारख्या अभिनेत्याकडून आम्हाला हे अपेक्षित नव्हतं. एकिकडे सोनू सूद कोरोना काळात अनेक गरजूंना मदत करतो आहे आणि दुसरीकडे अमिताभ बच्चन कोट्यवधींची कार खरेदी करत आहेत. अमिताभ यांनी सोनू सूदकडून काहीतरी शिकावं. इतका पैसा गाडीवर खर्च करण्यापेक्षा लोकांना दान करावं. त्यांची मदत करावी, अशी संतप्त प्रतिक्रिया एका नेटीझन्सनी दिली आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)