Taimur Ali Khan 2nd Birthday Celebration: दक्षिण आफ्रिकेमध्ये 'असं' सुरू आहे तैमुरच्या Birthday चं सेलिब्रेशन! (Photo)
दक्षिण आफ्रिकेतील केप टाऊनमध्ये करिना आणि सैफ सोबत तैमुरने कापला त्याचा Birthday Cake
Taimur Ali Khan 2nd Birthday Celebration: स्टार सेलिब्रिटी किड तैमुर अली खानचा (Taimur Ali Khan ) दुसरा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेमध्ये (South Africa) साजरा होत आहे. काही वेळापूर्वीच तैमुरच्या दुसर्या बर्थ डे सेलिब्रेशनचा फोटो सोशल मीडियावर आला आहे. सैफ अली खान (Saif Ali Khan) , करिना कपूर (Kareena Kapoor) आणि तैमुर केवळ तिघंचं या सेलिब्रेशनचा भाग झाले आहेत. डेनिम जॅकेटमधील बर्थ डे बॉय तैमुरच्या वतीने सैफच केक कापताना दिसत आहे. मुंबईत रंगली तैमूर अली खानची Pre Birthday Party ! (Photos)
काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये तैमुरच्या मित्रांसाठी आणि खान व कपूर कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये त्याच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन रंगलं होतं. त्यानंतर सैफिना आणि तैमुर दक्षिण आफ्रिकेच्या सहलीवर निघाले. Taimur Ali Khan Birthday Special: तैमुरचा दुसरा वाढदिवस दक्षिण आफ्रिकेत होणार साजरा ! पहा वर्षभरात इंटरनेटवर धूमाकूळ घालणारे तैमुरचे काही Viral फोटोज
दक्षिण आफ्रिकेमध्ये समुद्र किनारी खेळतानाचेही काही फोटो सोशल मीडियामध्ये शेअर करण्यात आले आहेत. मागील वर्षी तैमुरचा पहिला वाढदिवस पतौडी पॅलेसमध्ये साजरा करण्यात आला होता. यंदा मात्र सार्यांपासून दूर असला तरीही सोशल मीडियावर तैमुरला अनेकांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.