MS Dhoni Retires: महेंद्र सिंह धोनी सोबतचा जूना फोटो शेअर करत रणवीर सिंह याने शेअर केला मजेशीर किस्सा (View Post)
धोनीच्या या निर्णयावर अनेक स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह याने देखील धोनीसाठी खास पोस्ट केली आहे.
16 वर्षांच्या दमदार करिअरनंतर अखेर भारतीय क्रिकेटर महेंद्रसिंह धोनी (Mahendra Singh Dhoni) याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने भावून होत 'मैं पल दो पल का शायर हूं' या गाण्यासह आपल्या निवृत्तीची घोषणा केली. धोनीच्या या निर्णयावर अनेक स्तरातून प्रतिक्रीया येत आहे. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह (Ranveer Singh) याने देखील धोनीसाठी खास पोस्ट केली आहे. (अनुष्का शर्मा, रितेश देशमुख यांच्यासह इतर बॉलिवूड सेलिब्रिटींनी कॅप्टन कूलच्या निवृत्तीवर दिल्या भावनिक प्रतिक्रीया, View Tweets)
रणवीर सिंह याने इंस्टाग्राम अकाऊंटवर धोनी सोबतचा जूना फोटो शेअर करत एक मजेशीर किस्सा देखील सांगितला आहे. "हा फोटो माझ्यासाठी अत्यंत अनमोल आहे. कर्जतच्या एनडी स्टुडिओमध्ये सुमारे 2007/08 मधील हा फोटो आहे. तेव्हा मी 20-22 वर्षांचा होतो. सहाय्यक दिग्दर्शक म्हणून मी काम करत होतो. तेव्हा मी केवळ महेंद्रसिह धोनी यात आहे म्हणून ती केली होती. कारण मी त्याला भेटु इच्छित होतो. माझ्याकडून खूप काम करुन घेण्यात आले आणि मला पैसेही दिले नव्हते. पण मी तिकडे लक्ष दिले नाही. कारण मला फक्त त्या ठिकाणी उपस्थित राहायचे होते. मला त्या जाहिरातीच्या शूटिंग दरम्यान जखमही झाली होती. परंतु, तरी देखील केवळ धोनी भेटेल या आशेवर मी काम केले. पण जेव्हा त्याला भेटलो तेव्हा एकदम गोंधळलेला होतो. धोनी अत्यंत नम्र आहे."
रणवीर सिंह पोस्ट:
रणवीरने पुढे लिहिले की, "माझ्या पहिल्या सिनेमानंतर, सपना (तेव्हा माझी हेअरस्टाईल अशी होती) तेव्हा मला एक फोन आला आणि तु धोनीचा खूप मोठा चाहता आहेस, तो महबूब स्टुडिओ मध्ये शूटिंग करत आहे. ये इकडे. असे सांगण्यात आले. त्यानंतर मी सर्व काही सोडून धोनीला भेटण्यासाठी स्टुडिओच्या दिशेने धावत सुटलो. तेव्हा मी एक टोपी आणि जर्सी घातली होती. त्यावर मी चाहत्याप्रमाणे धोनीची स्वाक्षरी घेतली."
दरम्यान, रणवीर सिंह '83' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. कबीर खान दिग्दर्शित या सिनेमात 1983 वर्ल्ड कप विजयाची कथा दाखवण्यात आली आहे. यात रणवीर सिंह कपील देव यांची भूमिका साकारत आहे.