Manju Singh Passes Away: गोलमाल फेम अभिनेत्री मंजू सिंग यांचे निधन; लेखक स्वानंद किरकिरे यांनी सोशल मीडियावर दिली माहिती

त्यांनी 1983 मध्ये शोटाइमद्वारे टेलिव्हिजन निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यांचा 'एक कहानी' हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. या शोला देशभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

Manju Singh (PC- Twitter)

Manju Singh Passes Away: हिंदी चित्रपटसृष्टीतून पुन्हा एकदा दु:खद बातमी समोर आली आहे. ज्येष्ठ हिंदी टेलिव्हिजन प्रेझेंटर आणि अभिनेत्री मंजू सिंग (Manju Singh) यांचे निधन झाले. याबाबत माहिती देताना गीतकार, गायक आणि पटकथा लेखक स्वानंद किरकिरे यांनी मंजू सिंग यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर एक पोस्ट शेअर करताना, त्यांनी दूरदर्शनमध्ये त्यांच्यासोबत काम केलेल्या वेळेची आठवण सांगितली आहे.

स्वानंदने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, 'मंजू सिंग आता नाही! दूरदर्शनसाठी स्वराज हा कार्यक्रम लिहिण्यासाठी मंजूजींनी मला दिल्लीहून मुंबईत आणले! डीडीसाठी त्यांनी एक कहानी, शो टाईम इत्यादी अनेक अप्रतिम शो केले होते. हृषीकेश मुखर्जीचा गोलमालमधील रत्ना आपली प्रेमळ मंजू जी तुम्ही तुमचे प्रेम कसे विसरु शकतो…!' (हेही वाचा - Asha Bhosle यांचा मुलगा Anand ची तब्येत बिघडली, अचानक बेशुद्ध झाल्याने दुबईतील रुग्णालयात करण्यात आले दाखल)

मंजू सिंग हे भारतीय टेलिव्हिजन इंडस्ट्रीतील एक प्रसिद्ध नाव होते. त्यांनी स्वराज, एक कहानी, शो टाईम इत्यादी कार्यक्रमांची निर्मिती केली. प्रेमाने 'दीदी' म्हणून ओळखली जाणारी मंजू 'खेल खिलोने' या लहान मुलांच्या शोची अँकर होती. हा शो सुमारे सात वर्षे चालला. याशिवाय सिंग या हृषिकेश मुखर्जीच्या गोलमाल या चित्रपटातही दिसल्या होत्या. या चित्रपटात त्यांनी रत्नाची भूमिका साकारली होती.

सिंग यांनी त्यांच्या कार्यक्रमात राष्ट्रीय, सामाजिक आणि सांस्कृतिक विषयांवर प्रकाश टाकला. त्यांनी 1983 मध्ये शोटाइमद्वारे टेलिव्हिजन निर्माता म्हणून पदार्पण केले. त्यांचा 'एक कहानी' हा कार्यक्रम अनेक प्रादेशिक भाषांमधील साहित्यिक लघुकथांवर आधारित होता. या शोला देशभरातील प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

अलीकडच्या काळात मंजू सिंग लहान मुलांसाठी आणि तरुणांसाठीच्या अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांशी संबंधित काम करत होत्या. 2015 मध्ये, सर्जनशील कला आणि शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ओळखले गेले आणि भारत सरकारने त्यांचे केंद्रीय शिक्षण सल्लागार मंडळ (CABE) सदस्य म्हणून नामांकन केले.