Skoda च्या नव्या एसयुवीचा टीझर आला समोर, 10 लाखांची कार मार्च मध्ये लॉन्च होण्याची शक्यता
स्कोडाने (Skoda) भारतात त्यांची आगामी एसयुवी Kushaq लॉन्च करण्यापूर्वी त्याचा टीझर वेबसाईटवर झळकवला आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये वाहनाच्या ठिक खाली आणि साइड प्रोफाइलवर Skoda Kushaq वर त्याची झलक दिसणार आहे.
स्कोडाने (Skoda) भारतात त्यांची आगामी एसयुवी Kushaq लॉन्च करण्यापूर्वी त्याचा टीझर वेबसाईटवर झळकवला आहे. समोर आलेल्या टीझरमध्ये वाहनाच्या ठिक खाली आणि साइड प्रोफाइलवर Skoda Kushaq वर त्याची झलक दिसणार आहे. त्याचसोबत टीझर नीट पाहिल्यास लॉन्चिंग बद्दलच्या काही गोष्टी स्पष्ट होणार आहे. टीझरच्या खाली Summer 2021 लिहिण्यात आले आहे. म्हणजेच कंपनी यंदा उन्हाळ्याच्या काळात ही कार अधिकृत पद्धतीने लॉन्च केली जाऊ शकते.
दरम्यान, रिपोर्ट्सनुसार स्कोडा मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत कुशाक लॉन्च केली जाईल. याबद्दल पुष्टीी कंपनीच्या सेल्स, सर्विस अॅन्ड मार्केटिंग निर्देशक जॅक हॉलिस एक ट्विट मध्ये असे म्हटले की, ते एसयुवी लवकरच लॉन्च करणार आहेत. Zac च्या ट्विट नुसार कुशाक वर्षाच्या मध्यापर्यंत डिलरशिप पर्यंत पोहचणार आहे. ज्याची बुकिंग आणि ड्राइव्ह पुढील काही महिन्यांपासून सुरु केली जाणार आहे.(Tata Altroz i-Turbo भारतात लॉन्च, जाणून घ्या किंमतीसह कारच्या खासियत बद्दल अधिक)
Tweet:
काही दिवसांपूर्वी ही कार Vision In च्या रुपात मानली जात होती. जे याचे कॉन्सेप्ट होते. याच नावासह ही 2020 ऑटो एक्सपो मध्ये प्रदर्शित केली होती. स्कोडाच्या नामांतरणानंतर एसयुवीचे नाव कुशक ठेवले जाणार आहे. जी कंपनीच्या अन्य काही गाड्यांप्रमाणे K पासुन सुरु होणार असून Q वर संपणार आहे. स्कोडाच्या कुशक नावाचा संस्कृतातील अर्थ म्हणजे राजा किंवा सम्राट असा होता.
स्कोडाच्या या एसयुवी मध्ये फक्त दोन पेट्रोल इंजिन ऑप्शन दिले जाणार आहेत. यामध्ये 1.0 लीटर तीन सिलेंडर टीएसआय पेट्रोल इंजिन असणार आहे. जे बीडब्लू पोलो टीएसआय, वीडब्लू वेंटो आणि स्कोडा रॅपिडवर ही ड्युटी करणार आहे. हे इंजिन कमीतकमी 108 पीएसची पॉवर आणि 175एनएमचा पीक टॉर्क देणार आहे. या 6 स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स किंवा 6 स्पीड टॉर्क कन्वर्टर ऑटोमेटिक गिअरबॉक्स पेक्षा लैस असणार आहे.(MG ने लॉन्च केली MG Hector फेसलिफ्ट, फिचर्ससह पॉवर संबंधित Creta ला देणार टक्कर)
या व्यतिरिक्त कंपनी याच्यासह एक 1.5 लीटर पेट्रोल इंजिन ऑप्शन देऊ शकते. जो याच्या टॉप वेरियंटसह झळकवला जाणार आहे. हा 50 पीएसची पॉवर आणि 250 एनएमचा पीक टॉर्ज आउटपुट देतो. या इंजिनला फक्त 7 स्पीड ड्युअल क्लच ऑटोमेटिक गिअरबॉक्स ही दिला जाणार आहे.
(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)