Women Cut Off Husband's Penis: मुलीवर बलात्कार करत होता पती; संतप्त महिलेने कापून टाकले लिंग

मुलीने त्याला फोटो पाठवता त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने त्याबदल्यात तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली आणि तसे न केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली.

Image Used for Representational Purpose Only | (Photo Credits: File Image)

केजीएफ चित्रपटामध्ये एक वाक्य आहे, ‘आई ही जगातील सर्वात मोठी योद्धा आहे.’ ही गोष्ट अगदी खरी आहे कारण आई आपल्या मुलांसाठी काहीही करू शकते. मुलांचे संरक्षण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते. अगदी यासाठी गरज पडल्यास ती कोणाचा जीवही घेऊ शकते. असेच एक प्रकरण व्हिएतनाममधून (Vietnam) समोर आले आहे. येथे पतीने आपल्या मुलीसोबत केलेल्या घृणास्पद कृत्यानंतर महिलेने पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला आहे.

व्हिएतनामच्या tuotrenews वेबसाइटच्या वृत्तानुसार, व्हिएतनामच्या सोन ला प्रांतात एका महिलेला तुरुंगात टाकण्यात आले आहे, कारण तिने तिच्या पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला. रिपोर्टनुसार, 36 वर्षीय Ha Thi Nguyet ला मंगळवारी शिक्षा सुनावण्यात आली. परंतु प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता आणि ही महिला 3 मुलांच्या कुटुंबात एकमेव कमावती सदस्य असल्याने, महिलेची शिक्षा कमी करताना तिला 33 महिन्यांची शिक्षा सुनावली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, Ha Thi Nguyet ने 29 वर्षीय Nguyen Van H शी 2016 मध्ये लग्न केले. हे तिचे दुसरे लग्न होते. तिला तिच्या पूर्वीच्या पतीपासून एक मुलगी होती जी आता 15 वर्षांची आहे. ऑगस्ट 2020 पासून Nguyen Van H ने मुलीकडे वाईट नजरेने बघण्यास सुरुवात केली. त्यावेळी मुलगी फक्त 13 वर्षांची होती. त्याला त्याच्या सावत्र मुलीशी संबंध ठेवायचे होते. तिला आपल्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्याने फेसबूकवर बनावट नावाने अकाऊंट तयार केले आणि मुलीशी बोलणे सुरू केले.

या संवादामध्ये तो तिच्याकडून न्यूड फोटो प्राप्त करण्यात यशस्वी झाला. मुलीने त्याला फोटो पाठवता त्याने तिला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने त्याबदल्यात तिच्याकडे शारीरिक संबंधाची मागणी केली आणि तसे न केल्यास हे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. त्यानंतर ऑगस्ट 2020 ते मार्च 2022 पर्यंत त्याने मुलीवर बलात्कार केला. (हेही वाचा: जयपूरमध्ये श्रध्दा हत्याकांडासारखे कृत्य; आरोपीने मार्बल कटरने महिलेच्या मृतदेहाचे 10 तुकडे करून फेकले जंगलात)

19 मार्च 2022 रोजी सकाळी Ha Thi Nguyet ने आपल्या बेडजवळ एक छुपा कॅमेरा बसवला. तिला संशय होता की, कोणीतरी तिच्या पर्समधून पैसे चोरत आहे. त्याच दिवशी संध्याकाळी जेव्हा तिने व्हिडिओ रेकॉर्डिंग पाहिले तेव्हा तिच्या पायाखालची जमीनच सरकली कारण, तिच्या पतीचे कृत्य त्या सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. त्यानंतर संतप्त महिलेने रात्री पतीचा प्रायव्हेट पार्ट कापला.

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement