Italian Restaurant Shootout: कबाबमध्ये मीठ कमी असल्याने संतापलेल्या ग्राहकाने शेफवर झाडल्या गोळ्या
यानंतर तो आत गेला आणि शेफशी भांडू लागला. यादरम्यान पेकोरेलचा संयम सुटला. घाईघाईत त्याने बंदूक काढून 23 वर्षीय शेफ येल्फरी गझमन (chef Yelfri Gazman) वर गोळीबार केला.
Italian Restaurant Shootout: आजकाल लोकांचा संयम सुटत चालला आहे. लहानसहान गोष्टींवरून माणून हिंसक होत आहे. अशीच एक घटना इटलीमध्ये पाहायला मिळाली. येथील एका रेस्टॉरंटमध्ये एका व्यक्तीला बऱ्याच प्रतीक्षेनंतर जेवण मिळाले. त्यातही मीठ कमी होतं. त्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने शेफकडे जाऊन त्याच्यावर गोळ्या झाडल्या.
'द सन' च्या रिपोर्टनुसार, 29 वर्षीय फेडेरिको पेकोरेल (Federico Pecorel) इटलीच्या पेस्कारा शहरातील पियाझा सालोटो रेस्टॉरंट (Piazza Salotto restaurant) मध्ये जेवण करण्यासाठी गेला होता. हॉटेलमध्ये गेल्यावर त्याने कबाब (Kebab) मागवला आणि रेस्टॉरंटच्या बाहेर एका टेबलावर बसून तो जेवणाची वाट पाहू लागला. (हेही वाचा - Thane: धक्कादायक! नाश्त्यात मीठ जास्त झाल्याने संतापलेल्या पतीने केली पत्नीची गळा दाबून हत्या; ओरोपीला अटक)
पेकोरेलला खाण्याची ऑर्डर मिळाल्यावर त्याला कबाबमध्ये मीठ कमी वाटले. यानंतर तो आत गेला आणि शेफशी भांडू लागला. यादरम्यान पेकोरेलचा संयम सुटला. घाईघाईत त्याने बंदूक काढून 23 वर्षीय शेफ येल्फरी गझमन (chef Yelfri Gazman) वर गोळीबार केला. (हेही वाचा - Thane: धक्कादायक! नाश्ता न दिल्याच्या रागातून सासऱ्याने सुनेवर झाडली गोळी)
सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल जप्त -
त्यानंतर पेकोरेलने घटनास्थळावरून टॅक्सीने फरार झाला. लपण्यासाठी तो नातेवाईकांच्या घरी गेला. पण अखेर पोलिसांनी त्याला अटक केली. त्याच्याकडे सेमी ऑटोमॅटिक पिस्तूल सापडले. त्याचवेळी या घटनेनंतर शेफला रुग्णालयात नेण्यात आले. तिथे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या त्यांची प्रकृती सुधारत आहे.
पेकोरेलला मेंदूला झाली होती दुखापत -
रिपोर्ट्सनुसार, ही सर्व घटना सीसीटीव्हीसीमध्ये कैद झाली आहे. पीडित शेफ हा 2 वर्षांच्या मुलाचा बाप आहे. आता तो हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून बरा झाला आहे. पेकोरेलला वयाच्या 19 व्या वर्षी एका कार अपघातात मेंदूला गंभीर दुखापत झाली होती. त्यानंतर त्याला अपंगत्व निवृत्ती वेतन मिळत होते.