येथे देव नाही तर साप पूर्ण करतात भक्तांच्या इच्छा

म्यानमार मधील एका मंदिरामध्ये देव नाही तर चक्क साप भक्तांच्या इच्छा पूर्ण करताना दिसून येतात.

फोटो सौजन्य-Pixabay

प्रत्येक जण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी देवाकडे साकडे घालताना आपण पाहतो. मात्र म्यानमार  मधील एका मंदिरामध्ये देव नाही तर चक्क साप भक्तांच्या इच्छा पूर्ण करताना दिसून येतात. तसेच या मंदिरातील अजगर हे तेथील प्रवेशद्वारा पासून ते देवाच्या गाभाऱ्यापर्यंत दिसून येतात.

''बुंगदोग्योक पगोडा'' म्हणून हे मंदिर म्यानमारमधील यंगूर शहरात प्रसिद्ध आहे. तसेच हे मंदिर एका झऱ्याच्या ठिकाणी बांधले गेले आहे. तर मंदिरात येणारे भक्त हे अजहरांना पाहून घाबरत नाही तर चक्क त्यांची पूजा करुन त्यांच्याकडे आपली इच्छा व्यक्त करतात. मात्र येथे येणारे भक्त फक्त आपली एकच इच्छा सांगू शकतात असे या मंदिराच्या थीरींकडून सांगितले जाते. या मंदिरातील अजगरांची उपस्थिती शुभ मानली जाते.

तर येथील स्थानिक लोकांकडून असं सांगितले जाते की. एकदा गौतम बुद्ध एका झाडाखाली ध्यान करण्यास बसले होते. त्यावेळी जोराचा पाऊस पडण्यास सुरुवात होताच एका अजगरने त्याचा फणा पसरवून बुद्धांना आश्रय दिला होता. तसेच या मंदिरात साप दिला तर ते पुण्याचे काम समजले जाते.