'ही' कंपनी कर्मचाऱ्यांना देते सहा तास झोपण्याचा पगार

जपानमधील कजुहिको मोरियाना नावाची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क सहा तास झोपण्याचा पगार देते.

फोटो सौजन्य - Pexels

जपानमधील कजुहिको मोरियाना नावाची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना चक्क सहा तास झोपण्याचा पगार देते. तसेच जे कर्मचारी आठवड्यातून सलग पाच दिवस रात्रभर जागून काम करतात त्यांना कंपनी कडून काही पॉईंटस दिले जातात. या मिळालेल्या पॉईंट्समधून कर्मचारी खाण्याचे बिल देऊ शकतात अशी सोय करुन दिली आहे.

कजुहिको मोरियाना ही कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना झोपण्याचे पैसे देण्यासोबत त्यांना पुरेशी झोप मिळावी म्हणून ट्रेनिंगही देते. तर फुजी रियोकी या कंपनीने केलेल्या सर्वेक्षणानुसार, 20 वर्षापेक्षा अधिक वय असणारे 92% लोक त्यांना पुरेशी झोप मिळत नाही असे त्यांच्याकडून कळले आहे. याच कारणामुळे जपानचा कजुहिको कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांना पुरेशी झोप मिळावी म्हणून पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कर्मचाऱ्यांच्या अधिकारांची मान्यता न केल्यास देशाला नुकसान सोसावे लागते असे कंपनीचे म्हणणे आहे.

तर जवळजवळ या कंपनीकडून मिळणाऱ्या पॉईंट्सद्वारे कर्मचाऱ्यांना एका वर्षात 64 हजार येन म्हणजेच 570 डॉलर्सचा फायदा होत असल्याचे कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif