शाळकरी मुलींना प्यायचे होते रक्त, मात्र शिक्षिकेमुळे कट उधळला

अमेरिकेतील बार्टो या ठिकाणी एका शाळेमध्ये दोन विद्यार्थीनींना त्यांच्याच शाळेतील लहान मुलींची हत्या करुन रक्त प्यायचे असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

फोटो सौजन्य - PTI

अमेरिकेतील बार्टो या ठिकाणी एका शाळेमध्ये दोन विद्यार्थीनींना त्यांच्याच शाळेतील लहान मुलींची हत्या करुन रक्त प्यायचे असल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मात्र शिक्षकांच्या हजरजबाबीपणामुळे या दोन विद्यार्थीनींचा कट उघडकीस आला आहे.

बार्टोच्या एका मिडल स्कूलमध्ये शिकत असलेल्या दोघी विद्यार्थीनी सैतानपूजक आहेत. त्यामुळे या दोघींनी लहान मुलींची हत्या करुन त्यांचे रक्त पिण्याचे ठरविले होते. या हत्येच्या कटासाठी त्यांनी पिझ्झा कटर, कात्री आणि चाकू यांसारख्या धारधार वस्तूंचा वापर करणार होत्या. मात्र शाळेतील एका शिक्षिकेने या दोन मुलींना शाळेच्या बाथरुममध्ये या प्रकरणी बोलताना ऐकले. तसेच या दोघीही शाळेतील लहान मुली बाथरुममध्ये येण्याची वाट पाहत होत्या. तसेच या मुली जवळजवळ 15 लहान मुलींची हत्या करुन त्यांचे रक्त पिणार असल्याचे शिक्षिकेला कळले. या सर्व प्रकरणाची शिक्षेकेने तातडीने माहिती दिली.

पोलिसांनी त्वरीत शाळेत पोहचून या दोन मुलींना ताब्यात घेतले आहे. तर या दोन आरोपी मुलींच्या घराची झडती घेतली तेव्हा चिठ्ठीमध्ये या सर्व प्रकरणाचा खुलासा झाल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. तर चिठ्ठीमध्ये या दोघींनी रक्त प्यायल्यानंतर स्वत:ला संपवण्याचे ठरविले असल्याचे त्यात नमूद केले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif