रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी बनले जगातले पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती

यावेळी मुकेश अंबानी यांनी वॉरेन बफेला मागे टाकून फोर्ब्सच्या रिअल-टाइम रँकिंगमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने बुधवारी 2 हजार रुपयांची उच्चांकी पातळी ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

Mukesh Ambani (Photo Credit: File Photo)

रिलायन्स समुहाचे मालक (Reliance Industries Owner) मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे जगातले पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. यावेळी मुकेश अंबानी यांनी वॉरेन बफेला मागे टाकून फोर्ब्सच्या रिअल-टाइम रँकिंगमध्ये पाचवा क्रमांक मिळवला आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरने बुधवारी 2 हजार रुपयांची उच्चांकी पातळी ओलांडून नवा विक्रम प्रस्थापित केला.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरभावात सातत्याने वाढ होत आहे. बुधवारी या शेअरभावाने 2010 रुपयांची उच्चांकी पातळी गाठली. तसेच मुंबई शेअर बाजार बंद होतेवेळी हा शेअर 2004 रुपयांवर स्थिरावला. मार्चमध्ये शेअर बाजार मोठ्या प्रमाणात कोसळला होता. त्यावेळी रिलायन्स समुहाच्या शेअरचा भाव 867.43 रुपयांच्या नीचांकी पातळीवर आला होता. (हेही वाचा - National Flag Adoption Day 2020: आजच्या दिवशी तिरंग्याला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून मिळाला होता मान, वाचा ध्वजाशी संबंधित 'या' खास गोष्टी)

त्यामुळे केवळ 4 महिन्यात 130 टक्‍क्‍यांहून अधिक वाढ झाली. तसेच रिलायन्सने 12 लाख कोटी रुपयांच्या बाजार भांडवलीमूल्याचा टप्पा ओलांडला आहे. आज या कंपनीचे बाजार भांडवलीमूल्य 12.62 लाख कोटी रुपयांवर पोचले आहे.

Reliance समुहाचे मालक Mukesh Ambani हे जगातले पाचव्या क्रमांकाचे सर्वांत श्रीमंत व्यक्ती - Watch Video

जगातील सर्वाधिक श्रीमंताच्या यादीत पहिला क्रमांक ऍमेझॉनचे संस्थापक जेफ बेझॉस यांचा आहे. त्यांती संपत्ती 185.8 अब्ज डॉलर ऐवढी आहे. तसेच दुसरा क्रमांक मायक्रोसॉफ्टचे सहसंस्थापक बिल गेट्‌स यांचा असून त्यांची संपत्ती 113.1 अब्ज डॉलर इतकी आहे. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर बर्नार्ड आर्नो आणि चौथ्या क्रमांकावर फेसबुकचा सहसंस्थापक मार्क झुकरबर्ग यांचा क्रमांक आहे. याशिवाय रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांचा पाचवा क्रमांक असून त्यांची संपत्ती 75 अब्ज डॉलर इतकी आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif