IPL Auction 2025 Live

PNB Scam: नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट जाहीर, Westminster Court ची कारवाई

25 मार्च रोजी नीरव मोदीला कोर्टासमोर हजर व्हावं लागणार आहे.

नीरव मोदी (Photo Credit-Twitter @The Telegraph)

पंजाब नॅशनल बॅंकेच्या 13 हजार कोटीच्या घोटाळ्याचा (PNB Scam) आरोपी नीरव मोदी (Nirav Modi) याला लंडन मध्ये अटक होण्याची शक्यता आहे. लंडन येथील वेस्टमिंस्टर कोर्टात नीरव मोदी विरोधात अटक वॉरंट जारी करण्यात आल्याची माहिती मीडिया रिपोर्ट्समधून पुढे येत आहे. 25 मार्च रोजी नीरव मोदीला कोर्टासमोर हजर व्हावं लागणार आहे.

नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी काही दिवसांपासून भारत सराकार प्रयत्न करत होते. यामध्ये लंडन सरकारसोबत संपर्कात असलेल्या भारतीय अधिकार्‍यांच्या पाठपुराव्याला यश मिळालं आहे. लंडन सरकारने वेस्टमिंस्टरला दिलेल्या (Westminster Court)माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

टेलिग्राफ वृत्तपत्रकाने नीरव मोदीला लंडनमध्ये फिरताना गाठले होते. त्यावेळेस कोणत्याही प्रश्नांची उत्तरं न देता नीरव मोदी निघून गेला होत. काही दिवसातच भारतातून ईडीचे काही अधिकारी लंडनमध्ये पोहचले. आता नीरव मोदी यांच्या अटकेची शक्यता वाढली आहे.

टेलिग्राफशी बोलताना नीरव मोदीने महागडे जॅकेट घातले होते. त्यानंतर नीरव मोदीच्या ऐशोआरामाची, जीवनशैलीची चर्चा वाढली होती. 'नीरव मोदी'च्या Ostrich Hide Jacket लूकची सोशल मीडियात चर्चा, 8-10 लाखाच्या या जॅकेट्समध्ये असं नेमकं काय आहे?

आता लंडनमध्ये स्थित नीरव मोदी आणि किंगरफिशर एअरलाईंसचे विजय माल्या यांचं भारतामध्ये प्रत्यार्पण व्हावं यासाठी प्रयत्न सुरू आहेत.