पाकिस्तान: हंगू मध्ये स्फोट, 25 जणांचा मृत्यू, 30 जखमी

पाकिस्तानातील कराची येथील चिनी दूतवासाजवळ हल्ल्या नंतर आता खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये बॉम्ब स्फोट झाला आहे

फोटो सौजन्य- Pixabay

पाकिस्तानातील कराची येथील चिनी दूतवासाजवळ हल्ल्या नंतर आता खैबर पख्तूनख्वातील हंगूमध्ये बॉम्ब स्फोट झाला आहे. त्यामुळे तेथील नागरिक स्फोटामुळे हादरले आहेत.

या स्फोटात 25 जणांचा मृत्यू झाला असून 30 जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या परिसराला पोलिसांनी चारही बाजूंनी घेरले असून या बॉम्ब स्फोट प्रकरणी अधिक तपास चालू आहे. तर जखमी झालेल्या नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. (हेही वाचा : पाकिस्तान: कराची येथील चिनी दुतावास कार्यालयावर बॉम्बहल्ला)

तर काही वेळापूर्वीच कराची येथील चिनी दुतावास कार्यालयावर बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. तसेच हा परिसर 'रेड झोन' म्हणून ओळखला जातो. तर या ठिकाणी विविध देशांची कार्यालये आहेत.