New Porn Survey: वर्क फ्रॉम होम कल्चरमुळे पॉर्न पाहण्याचे व्यसन वाढले; अहवालात समोर आले धक्कादायक सत्य
प्रातिनिधिक प्रतिमा (Photo Credits: File Image)

कोरोना साथीच्या रोगामुळे अनेक कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना घरून काम करण्याची मुभा दिली. अजूनही अनेक कंपन्यांचे कर्मचारी घरूनच काम करत आहेत. आता या वर्क फ्रॉम होममुळे यूकेमध्ये पोर्न (Porn Videos) पाहण्याचे व्यसन वाढले आहे. मीडिया रिपोर्ट्समध्ये ही माहिती देण्यात आली आहे. महामारीच्या काळात वर्क फ्रॉम होम लोकप्रिय झाल्यामुळे, पोर्न पाहण्याच्या समस्येसाठी वैद्यकीय मदत घेणार्‍या यूके नागरिकांची संख्या जवळपास दुप्पट झाली आहे. डेली मेलच्या अहवालात ही माहिती समोर आली आहे.

तज्ञांच्या मते, वर्क फ्रॉम मुळे काही पॉर्न दर्शकांमध्ये ही व्यसनाधीनता वाढण्यास हातभार लावला असून, जे लोक आधीच पॉर्न पाहत होते त्यांच्यामध्ये ही समस्या आणखीन वाढली आहे. पोर्न व्यसन हा लैंगिक व्यसनाचा एक प्रकार आहे, ज्यामध्ये युजर्समध्ये आनंददायक संवेदना किंवा लैंगिक क्रियाकलापांचे व्यसन विकसित होते.

यूके मधील सर्वात मोठे सेक्स आणि पॉर्न व्यसनमुक्ती क्लिनिक, लॉरेल सेंटर म्हणाले की, ते आता काही लोकांवर उपचार करत आहेत जे दिवसात 14 तासांपर्यंत पोर्न पाहतात. पॉला हॉल, केंद्राच्या क्लिनिकल डायरेक्टर यांनी सांगितले की, वर्क फ्रॉम होममुळे लोक आता पूर्वीपेक्षा त्यांच्या संगणकासमोर एकटे अधिक वेळ घालवत आहेत, यामुळे त्यांच्यामध्ये पॉर्न पाहण्याची सवय वाढली आहे.

त्यांनी पुढे सांगितले की, ‘वर्क फ्रॉम होममुळे पॉर्न पाहण्यासाठी तुम्हाला अधिक संधी मिळाली आहे. यासाठी तुम्हाला रात्री घरी जाईपर्यंत थांबावे लागत नाही, तुम्ही दिवसा अधिक आवेगपूर्ण होऊ शकता.’ अहवालात म्हटले आहे की लॉरेल सेंटरने 2022 च्या पहिल्या सहा महिन्यांत सुमारे 750 पॉर्न व्यसनी पाहिले आहेत, तर 2019 मध्ये ही संख्या 950 होती. (हेही वाचा: Sex Partners Of Women: पुरुषांच्या तुलनेत महिलांचे सेक्स पार्टनर अधिक, राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणमध्ये खुलासा)

सेंटरने नमूद केले की या वर्षी क्लिनिकमध्ये येणाऱ्या रुग्णांना अधिक सखोल उपचारांची आवश्यकता होती. अहवालानुसार, लंडन क्लिनिकमधील डॉक्टर आता पॉर्न व्यसन असलेल्या लोकांना मदत करण्यासाठी महिन्याला सुमारे 600 तास घालवतात, जे 2019 मध्ये फक्त 360 तास होते.