लायन एअरवेज विमान अपघात : 188 प्रवाशांसह जकार्ताहून निघालेलं विमान टेक ऑफ़नंतर अवघ्या 13 मिनिटांत कोसळलं

जकार्ताहून पान्गकल पिनांगला निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या 13 मिनिटांमध्ये कोसळले

लायन एअरवेज विमान अपघात (Photo Credit-ANI)

सोमवारी (29 ऑक्टोबर ) सकाळी जकार्ताहून पान्गकल पिनांगला निघालेले विमान उड्डाणानंतर अवघ्या 13 मिनिटांमध्ये कोसळले. हे विमान लायन एअरवेजचे होते. सुरूवातीला या विमानाचा संपर्क तुटला होता. मात्र अखेर 'रॉयटर्स'वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार शोध पथकाने हे विमान कोसळले आहे. विमानाचे काही अवशेष समुद्रामध्ये सापडले आहे. लायन एअरवेजने दिलेल्या माहितीनुसार, या विमानात 188 प्रवासी होते.

 

सोमवारी सकाळी 6.33 मिनिटांनी जकार्तातून निघालेल्या विमानाचा संपर्क तुटला आहे. प्रशासनाने डोंगर परिसरामध्ये शोध मोहिम हाती घेतल्याची माही एका वृत्तपत्रकाने दिली होती. लायन एयर जेट जेटी 610 या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याबाबतची माहिती अजूनही मिळालेली नाही.

इंडोनेशियाच्या सर्च अ‍ॅन्ड रेस्क्यू एजंसीचे प्रवक्ते युसूफ लतीफ यांनी विमान कोसळल्याची माहिती दिली आहे. इंडोनेशियाची राजधानी जकार्ताहून निघालेल्या विमानात 188 प्रवासी होते. विमानाचा संपर्क तुटण्यापूर्वी ते विमान आकाशात 3650 फीट होते. आता समुद्रात विमानाचा काही भाग आणि खूर्च्यांचे अवशेष सापडले आहेत.