Water Crisis Pakistan: पाकिस्तानमध्ये पाणीबाणी; रावळपिंडी आणि इस्लामाबादसाठी फक्त 35 दिवसांचा पाणीसाठा शिल्लक; खानपूर धरण जलसंकटात

पाकिस्तानमधील खानपूर धरण गंभीर पातळीच्या जवळ आहे, पावसाअभावी पाणीपुरवठा फक्त 35 दिवस चालेल असा अंदाज आहे. अधिकाऱ्यांनी रावळपिंडी, इस्लामाबाद, पंजाब आणि खैबर पख्तूनख्वासाठी पिण्याचे आणि सिंचनाचे पाणी कमी होण्याचा इशारा दिला आहे.

Water | representative pic- (photo credit -pixabay)

खानपूर धरण पाणी पातळीत (Khanpur Dam Water Crisis) लक्षणीय घट झाल्यामुळे रावळपिंडी (Rawalpindi Water Supply) आणि इस्लामाबादमध्ये तीव्र पाणीटंचाई (Islamabad Water Shortage) निर्माण होत आहे, ज्यामुळे फक्त 35 दिवस पुरेल इतका साठा शिल्लक आहे. अधिकाऱ्यांनी धोक्याची घंटा वाजवत इशारा दिला आहे की, पुढील दोन आठवड्यांत मोठा पाऊस पडला नाही तर परिस्थिती पूर्णपणे संकटात जाऊ शकते. त्यामुळे भारत-पाकिस्तान सीमावाद (India-Pakistan border dispute) तापला असतानाच पाकसमोर (Water Crisis Pakistan) पुन्हा एकदा नवे आव्हान उभे ठाकले आहे.

खानपूर धरणपात्र कोरडे

वृत्तसंस्था एएनआयने पाकमधील वृत्तपत्र डॉनचा हवाला देत दिलेल्या वृत्तानुसार, धरणातील पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे पूर्वी पाण्याखाली बुडालेला भाग उघडा पडत आहे. विशेषतः मुख्य साठवणूक मार्ग आणि गळती मार्गांभोवती खडक आणि ढिगारे उघडले दिसू लागले आहेत, ज्यामुळे हवामान बदल आणि भूजल पातळी कमी होण्याचे गंभीर परिणाम अधोरेखित होतात. (हेही वाचा, Pakistan PM Shehbaz Sharif On Operation Sindoor: भारताकडून करण्यात आलेला एअर स्ट्राईक 'Act of War'; ऑपरेशन सिंदूर वर पाकिस्तान पीएम शहबाज शरीफ यांची प्रतिक्रिया)

धरणातील येवा घसरला

जल आणि वीज विकास प्राधिकरणाच्या (वापडा) अधिकाऱ्यांनी सांगितले की, या वर्षी मार्गल्ला टेकड्या आणि गलियातसह धरणाच्या पाणलोट क्षेत्रात अपुरा पाऊस पडला आहे. परिणामी, नैसर्गिक झरे कोरडे पडले आहेत आणि धरणात येणारा प्रवाह 82 क्युसेकपर्यंत घसरला आहे, तर दररोजचा विसर्ग 35 क्युसेक इतका आहे, जो जवळजवळ तीन पट जास्त आहे. ( नक्की वाचा:  Operation Sindoor: बहावलपूरमध्ये झालेल्या भारतीय क्षेपणास्त्र हल्ल्यात Jaish-e-Mohammad चा प्रमुख Masood Azhar च्या कुटुंबातील 10 सदस्य ठार; मृतांमध्ये बहिण, पुतण्या व त्याच्या पत्नीचा समावेश.  )

धरणाची पाण्याची पातळी सरासरी समुद्रसपाटीपासून (AMSL) 1,935 फूट वर नोंदवली मंगळवारपर्यंत गेली, जी 1.910 AMSL च्या मृत पातळीपेक्षा फक्त 25 फूट जास्त आहे. तात्काळ आणि पुरेसा पाऊस न पडता, पाण्याची पातळी झपाट्याने कमी होण्याची अपेक्षा आहे.

 खानपूर धरणातील पाणीसाठ्याची सद्यस्थिती दर्शविणारा तक्ता:

घटक मोजमाप
सध्याचा पाण्याचा स्तर 1,935 फूट एएमएसएल
मृत स्तर (Dead Level) 1,910 फूट एएमएसएल
पाण्याची येणारी मात्रा ८२ क्यूसक्स/दिवस
पाण्याची जाणारी मात्रा 235क्यूसक्स/दिवस
उर्वरित पाणीपुरवठा कालावधी अंदाजे 35दिवस

पाणी वितरण तपशील:

  • राजधानी विकास प्राधिकरण (CDA): 90 क्युसेक/दिवस
  • लहान नागरी संस्था (UET तक्षशिलासह): 6.18 क्युसेक/दिवस
  • खैबर पख्तुनख्वा (सिंचन): 48 क्युसेक/दिवस
  • पंजाब (कृषी): 42 क्युसेक/दिवस

गंभीर परिस्थितीमुळे, शहरी भागांसाठी पिण्याचे पाणी वाचवण्यासाठी पुढील आठवड्यापासून पंजाब आणि खैबर पख्तुनख्वाला सिंचन पाणीपुरवठा थांबवण्याची योजना अधिकारी आखत आहेत. तज्ञांचे म्हणणे आहे की पाण्याचा हा ताण पाकिस्तानमधील हवामानाशी संबंधित व्यापक असुरक्षितता दर्शवितो आणि शाश्वत पाणी व्यवस्थापन आणि सुधारित पर्जन्यमान साठवण्याच्या पायाभूत सुविधांची तातडीची गरज अधोरेखित करतो.

(Social media brings you the latest breaking news, viral news from the world of social media including Twitter, Instagram and YouTube. The above post is embedded directly from the user's social media account. This body of content has not been edited or may not be edited by Latestly staff. Opinions appearing on social media posts and the facts do not reflect the opinions of Latestly, and Latestly assumes no responsibility for the same.)

Share Now
Advertisement


Advertisement
Advertisement
Share Now
Advertisement