800 फूट दरीत कोसळून भारतीय इंजिनियर दांम्पत्याचा मृत्यू

फिरण्याचा,नव्या जागी जाण्याचा छंद असणारं जोडपं 'हॉलिडेज आणि हॅप्पिली एवर आफ़्टर' हा ब्लॉगही लिहीत होते.

भारतीय इंजिनियर दांम्पत्याचा मृत्यू

अमेरिकेत राहणार्‍या विष्णू विश्वनाथ आणि मिनाक्षी मूर्ती या जोडप्याचा 800 फूट दरीत कोसळून दुर्देवी मृत्यू झाला आहे. कॅलिफॉर्नियाच्या योजेमीट नॅशनल पार्कमध्ये हे जोडपं फिरायलं गेलं होतं. त्यावेळेस हा अपघात झाला. सोमवारी या दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यास यश मिळाले आहे.

काही दिवसांपूर्वीच हे जोडपं न्यूयॉर्कमध्ये रहायला आलं होतं. पेशाने इंजिनिअर असणारा विश्वनाथ सिस्टिम इंजिनियर म्हणून काम करत होता. दोघांनाही फिरण्याचा,नव्या जागी जाण्याचा छंद होता.

'हॉलिडेज आणि हॅप्पिली एवर आफ़्टर' हा ब्लॉगही ते लिहीत असतं. या ब्लॉगद्वारा ते ट्रीपच्या आठवणी शेअर करत होते.

 

विष्णू आणि मिनाक्षी यांच्या अपघाताचं नेमकं कारण समजू शकले नाही. मात्र काही आठवड्यांपूर्वी हा अपघात झाला. योसेमिटी नॅशनल पार्कचे अधिकारी त्यांना शोधण्यासाठी प्रयत्न करत होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif