जगप्रसिद्ध फॅशन कंपनीने जाळली 260 कोटींची प्रॉपर्टी
विक्री न झालेले कपडे, एक्सेसरीज आणि परफ्यूम अशी उत्पादने कंपनीने ब्रँड व्हॅल्यू घटवण्यासाठी नष्ट केले होते.
इग्लंडची सुप्रसीद्ध कंपनी बरबेरीने नुकतीच घोषणा केली आहे की, ते आपली शिल्लख राहीलेली किंवा काही कारणाने खराब झालेली उत्पादने जाळणार नाहीत. तसेच, शिल्लख उत्पादने जाळण्याचा आपला निर्णयही रद्द करणार आहे. कंपनीने पुढे असेही म्हटले आहे की, यापुढे उत्पादित केलेल्या उत्पादनांमध्ये जास्तीत जास्त नैसर्गिक घटकांचा वापर केला जाईल. तसेच, अनैसर्गिक घटक वापरून तयार करण्यात येणाऱ्या उत्पादनांतून हे घटक त्वरीत हटविण्यात येतील. जुलै, महिन्यात प्रकाशित केलेल्या अहवालातही कंपनीने या धोरणाबाबत सूतोवाच केले होते. तसेच, विक्री न झालेले कपडे, एक्सेसरीज आणि परफ्यूम अशी उत्पादने कंपनीने ब्रँड व्हॅल्यू घटवण्यासाठी नष्ट केले होते. जाळून नष्ट केलेल्या या एकूण उत्पादनांची किंमत सुमारे 260 कोटी रूपये इतकी होती.
कंपनीने अहवाल प्रसिद्ध करताच पर्यावरणवादी आणि निसर्गमित्र कार्यकर्त्यांनी तीव्र टीका केली. ही टीका गांभीर्याने घेत कंपनीने सांगितले की, 2017 हे वर्ष आमच्यासाठी अत्यंत कठीण ठरले. कंपनीला सुमारे 76 कोटी रूपयांची किंमत असलेली आपली जूनी परफ्यूम उत्पादनं नष्ट करावी लागली होती. अमेरिकी कंपनी कोटीसोबत झालेल्या करारानंतर कंपनीने हा निर्णय घेतला होता. या निर्णयाबाबत अनेक फॅशन फर्मही बरबेरीसोबत सहभागी होत्या. दरम्यान, शिल्लख राहीलेली जूनी पुरानी उत्पादने चोरी होण्याच्या किंवा चोरबाजारात कमी किमतीने विकली जाण्याची शक्यता विचारात घेऊन कंपनीने हा निर्णय घेतला होता.
दरम्यान, कंपीने पुढे म्हटले आहे की, आम्ही पूर्वीपासूनच निसर्गाचा आदर करतो म्हणूनच विक्री न झालेली, परत आलेली तसेच, एक्सपायरी डेट उलटून गेलेल्या उत्पादनांना कंपनी रिसायकल करते. पण, आता यापूढे ही यंत्रणा अधिक वेगाने आणि काळजीपूर्वक कार्यन्वीत केली जाईल.
बरबेरीबाबत बीबीसीने प्रसिद्ध केलेल्या एका वृत्तानुसार, पर्यावरण प्रचार समूह ग्रीनपीसने म्हटले आहे की, आपला ओव्हरस्टॉक नष्ट करण्यासाठी बरबेरीने हा निर्णय घेतला. हा निर्णय म्हणजे फॅशन उद्योगाच्या बदलत्या विचारधारेचे प्रतिक आहे. फॅशन इंडस्ट्री अवघ्या जगभरात आहे. या इंडस्ट्रीसमोरचा प्रश्न असा की, प्रतिवर्ष सुमारे 6,31,700 कोटींहून अधिक कपडे बनवते. त्यामुळे जगभरातील ग्राहकांची कपाटं आगोदरच गच्च भरली आहेत. अशात ओव्हरस्टॉक (अतिरिक्त उत्पादन) चे करायचे काय हा सवाल कंपन्यांसमोर आहे.