Parag Agrawal यांच्यासह 3 माजी ट्विटर अधिकाऱ्यांनी एलोन मस्कवर दाखल केला खटला; काय आहे नेमकी प्रकरण? जाणून घ्या
Parag Agrawal Sued Elon Musk: इलॉन मस्क (Elon Musk) यांच्यावर पराग अग्रवाल (Parag Agrawal) यांच्यासह ट्विटरच्या माजी तीन प्रमुख अधिकाऱ्यांनी खटला दाखल केला आहे. या खटल्यात काँग्रेसमधील तपास, पूर्वीच्या नोकरीदरम्यान झालेल्या खर्चासाठी नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे. या खटल्यात माजी सीईओ पराग अग्रवाल आणि कंपनीचे माजी कायदेशीर प्रमुख आणि वित्तीय अधिकारी यांच्याकडून 1 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त रक्कम मागितली असून ट्विटर कायदेशीररित्या ही रक्कम देण्यास बांधील असल्याचं म्हटलं आहे.
कोर्ट फाइलिंगमध्ये यूएस सिक्युरिटीज अँड एक्सचेंज कमिशन (SEC) आणि डिपार्टमेंट ऑफ जस्टिस (DOJ) यांच्या तपासाशी संबंधित अनेक खर्चांचा उल्लेख आहे, परंतु तपासाचे स्वरूप किंवा तपास चालू आहे की नाही याचा समावेश नाही. याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. (हेही वाचा - Elon Musk Removed Doggy Logo: इलॉन मस्कने हटवला डॉगीचा लोगो; Dogecoin कंपनीला 12 हजार कोटींचा तोटा)
अग्रवाल आणि मुख्य वित्तीय अधिकारी नेड सेगल यांनी SEC ला दिलेल्या निवेदनानुसार, ते फेडरल एजन्सींना त्यांच्या तपासात सहकार्य करत आहेत. मस्कने ट्विटर विकत घेताना सर्व नियमांचे पालन केले होते का याची SEC चौकशी करत आहे.
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, सोशल मीडिया कंपनी ट्विटरचे 44 बिलियन डॉलरमध्ये विकत घेतल्यानंतर कंपनीचे उच्च अधिकारी अग्रवाल, गाडगे आणि सहगल यांना मस्कने बाहेरचा रस्ता दाखवला होता. तसेच, कंपनीचा खर्च कमी करण्यासाठी मस्कने सुमारे 50 टक्के कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते.
मस्कने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म घेतल्यापासून अनेक बदल करण्यात आले आहेत. आता ट्विटरने ब्लू टिकचे पैसे आकारण सुरू केलं आहे. आता कोणीही 14.99 $ भरून ब्लू टिक मिळवू शकतो.