IPL Auction 2025 Live

Elon Musk यांनी लॉन्च केला 'Burnt Hair' नावाचा परफ्युम; किंमत ऐकून बसेल धक्का (See Tweet)

बोरिंग कंपनीच्या वेबसाईटवरून 'बर्न्ट हेअर' परफ्यूम विकला जात आहे. या परफ्यूमची किंमत 100 यूएस डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 8400 रुपये आहे.

Elon Musk and his new perfume product (Photo Credits: Wiki and Twitter)

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्ला कंपनीचे मालक एलॉन मस्क (Elon Musk) यांनी आता नव्या व्यवसायाची घोषणा केली आहे. मस्क यांनी त्यांचा नवीन ‘बर्न्ट हेअर’ (Burnt Hair) नावाचा परफ्यूम लॉन्च केला आहे. या सोबतच मस्क यांनी त्यांचे ट्विटर बायो ‘परफ्यूम सेल्समन’ असे अपडेट केले आहे. मस्क यांनी बर्न्ट हेअर परफ्युमच्या सुगंधाला ‘पृथ्वीवरील सर्वोत्तम सुगंध’ म्हटले आहे. त्यांनी दावा केला आहे की कंपनीने लॉन्च केल्याच्या 10 मिनिटांत या परफ्युमच्या 10,000 वायल्स विकल्या गेल्या.

या बाटल्यांची शिपिंग 2023 च्या पहिल्या तिमाहीपासून (Q1) सुरू होईल. बोरिंग कंपनीच्या वेबसाईटवरून 'बर्न्ट हेअर' परफ्यूम विकला जात आहे. या परफ्यूमची किंमत 100 यूएस डॉलर आहे, जी भारतीय रुपयांमध्ये अंदाजे 8400 रुपये आहे. एलॉन मस्कने खुलासा केला की, बर्न्ट हेअर परफ्यूम क्रिप्टोकरन्सीद्वारे पैसे देऊन देखील खरेदी केले जाऊ शकतो. यासाठी शिपिंग शुल्क 3,000 रुपये असेल. या उत्पादनाविषयी, मस्क म्हणतात, हे परफ्युम प्रत्येक जेन्डरसाठी वापरले जाऊ शकते.

'बर्न्ट हेअर' परफ्यूमची छोटी बाटली ही लाल रंगाची असून तिचे नाव चांदीच्या अक्षरात लिहिलेले आहे. द बोरिंग कंपनीच्या वेबसाइटनुसार, 'बर्न्ट हेअर' परफ्यूमचा सुगंध हा जगातील सर्वोत्तम सुगंध आहे. हा एक असा परफ्यूम आहे, जो तुम्हाला गर्दीत वेगळे बनवतो. (हेही वाचा: Aliens Will Land On Earth: यावर्षी 8 डिसेंबरला एलियन्स उतरणार पृथ्वीवर; Time Traveller ने वर्तवल्या 5 भविष्यवाण्या)

दरम्यान, एलोन मस्क यांनी इयान ब्रेमनर यांनी केलेल्या दाव्याचे खंडन केले आहे, ज्यात मस्क यांच्यावर आरोप होता की त्यांनी अलीकडेच रशियाच्या अध्यक्षांना व्लादिमीर पुतिन यांच्याशी संवाद साधला होता. मिळालेल्या माहितीनुसार, सीएनबीसीनुसार, ब्रेमरने या आठवड्याच्या सुरुवातीला हा दावा केला होता. याबाबत टेस्ला आणि स्पेसएक्सच्या सीईओने ट्विट केले की, मी पुतीन यांच्याशी फक्त एकदाच बोललो आहे आणि ते 18 महिन्यांपूर्वी होते, ज्याचा विषय अंतराळ हा होता.

Tags