Aliens Will Land On Earth: यावर्षी 8 डिसेंबरला एलियन्स उतरणार पृथ्वीवर; Time Traveller ने वर्तवल्या 5 भविष्यवाण्या

ज्या व्यक्तीने हा दावा केला आहे तो टिकटॉकवर एनो अॅल्रिक (Eno Alric) किंवा 'थेरॅडिएंटटाइम ट्रॅव्हलर' म्हणून ओळखला जातो. अलीकडेच त्याने टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामुळे खळबळ उडाली.

Aliens Will Land On Earth: यावर्षी 8 डिसेंबरला एलियन्स उतरणार पृथ्वीवर; Time Traveller ने वर्तवल्या 5 भविष्यवाण्या
Representational Image (Photo Credits: PTI)

जगातील अनेक लोकांनी एलियन (Aliens) पाहिल्याचा दावा केला आहे. आपला हा दावा सिद्ध करण्यासाठी या लोकांनी अनेक व्हिडिओ आणि फोटो देखील दाखवले आहेत, परंतु शास्त्रज्ञांनी अजूनतरी एलियनचे अस्तित्व ठामपणे मान्य केले नाही. आता एका व्यक्तीने एलियन्सबाबत अजब दावा केला आहे, जो सध्या व्हायरल होत आहे. ही व्यक्ती स्वत:ला टाईम ट्रॅव्हलर (Time Traveller) म्हणवतो. डेलीस्टारच्या रिपोर्टनुसार, या स्वयंघोषित टाइम ट्रॅव्हलरने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पाच भविष्यवाण्या शेअर केले आहेत. यातील सर्वात मनोरंजक भविष्यवाणी म्हणजे 8 डिसेंबरला एका महाकाय उल्कामधून एलियन्स पृथ्वीवर उतरणार आहेत.

ज्या व्यक्तीने हा दावा केला आहे तो टिकटॉकवर एनो अॅल्रिक (Eno Alric) किंवा 'थेरॅडिएंटटाइम ट्रॅव्हलर' म्हणून ओळखला जातो. अलीकडेच त्याने टिकटॉकवर एक व्हिडिओ पोस्ट केला, ज्यामुळे खळबळ उडाली. भारतात टिकटॉकवर बंदी असली तरी अनेकांनी तो व्हिडिओ इतर व्यासपीठांवरून डाउनलोड करून यूट्यूब आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे.

एनोने एकूण पाच भविष्यवाण्या केल्या आहेत. एनो अॅल्रिकच्या मते, 30 नोव्हेंबर 2022 रोजी जेम्स वेब टेलिस्कोप एक नवीन ग्रह शोधेल, जो पृथ्वीसारखा असेल. त्यानंतर 8 डिसेंबर 2022 रोजी एक उल्का पृथ्वीवर धडकेल, ज्यामध्ये नवीन प्रकारचे धातू आणि परदेशी प्रजाती असतील. म्हणजेच एलियन्स पृथ्वीवर येतील. यानंतर, 6 फेब्रुवारी 2023 रोजी, 4 तरुणांना एक साधन सापडेल, जे आकाशगंगांसाठी वर्महोल उघडेल. (हेही वाचा: ISRO च्या हाती मोठे यश, चंद्राच्या पृष्ठभागावर शोधला Sodium, नॅशनल स्पेस एजन्सीची माहिती)

पुढे 23 मार्च 2023 रोजी मारियाना खंदकाचा शोध घेणाऱ्या शास्त्रज्ञांच्या टीमला प्राचीन प्रजाती सापडतील. त्यानंतर 15 मे 2023 रोजी अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर 750 फूट उंचीची सुनामी धडकेल. अशा या भविष्यवाण्या आहेत. एनोने दवा केला आहे की, तो टाइम ट्रॅव्हलर असून, 2671 सालामधून प्रवास करून परतला आहे. परंतु आपले हे दावे सिद्ध करण्यासाठी त्याने कोणतेही ठोस पुरावे दिले नाहीत.

(The above story first appeared on LatestLY on Oct 09, 2022 07:52 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).