कोरोना व्हायरस दरम्यान, Pakistan मध्ये सुरु झाली शैक्षणिक संस्था उघडण्याची तयारी; सप्टेंबरच्या मध्यापासून सुरु होणार माध्यमिक शाळा, महाविद्यालये
पाकिस्तान (Pakistan) मधील कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या परिस्थितीत सातत्याने सुधारणा होत आहे, अशात इम्रान खान सरकारने सप्टेंबरच्या मध्यापासून शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे
पाकिस्तान (Pakistan) मधील कोरोना व्हायरस (Coronavirus) च्या परिस्थितीत सातत्याने सुधारणा होत आहे, अशात इम्रान खान सरकारने सप्टेंबरच्या मध्यापासून शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याची तयारी सुरू आहे. शनिवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती वृत्तसंस्थेला दिली. कोरोना विषाणूच्या साथीमुळे पाकिस्तानमध्ये 16 मार्चपासून शैक्षणिक संस्था बंद आहेत. पाकिस्तानच्या आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या एका रात्रीत देशात कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे मृत्यूची केवळ एक घटना घडली. कोविड-19 मुळे देशात आतापर्यंत 6,284 लोक मरण पावले आहेत. मंत्रालयाने म्हटले आहे की, गेल्या 24 तासांत देशात कोरोना विषाणूच्या 319 नवीन घटनांची नोंद झाली असून, संक्रमित लोकांची एकूण संख्या 2,95,372 वर पोहचली आहे.
पाकिस्तानमध्ये सिंध प्रांतात सर्वाधिक 1,29,179 रुग्ण आढळले आहेत. त्यानंतर पंजाबमध्ये 96,699, खैबर-पख्तूनख्वा येथे 35,971, इस्लामाबादमध्ये 15,597, बलुचिस्तान येथे 12,804, गिलगित-बाल्टिस्तान येथे 2,832 पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमध्ये 2,290 नोंद झाली. दरम्यान, पंतप्रधान इम्रान खान यांनी शुक्रवारी सांगितले की 15 सप्टेंबरपासून शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करता येतील आणि प्रांतांना याबाबत व्यवस्था करण्यास सांगितले गेले आहे.
कोविड-19 च्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे अध्यक्ष, इम्रान खान म्हणाले की शैक्षणिक संस्था पुन्हा सुरू करण्याची वेळ आली आहे. परंतु 7 सप्टेंबरला अजून एक उच्चस्तरीय बैठक होणार असून, या संदर्भात अंतिम निर्णय घेतला जाईल. खान यांच्या हवाल्याने दिलेल्या निवेदनात असे सांगण्यात आले की, सुरुवातीला माध्यमिक शाळा, महाविद्यालये आणि विद्यापीठे सुरू केली जातील. प्राथमिक शाळांना लगेचच सुरु करण्यात येणार नाही. (हेही वाचा: कोरोना विषाणूमुळे जगातील पर्यटन क्षेत्राला पाच महिन्यांत 320 अब्ज डॉलर्सचे नुकसान; 12 कोटी नोकऱ्या धोक्यात- UN)
दरम्यान, चीनमध्येही कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी खबरदारीच्या उपायांसह शाळा पूर्णपणे उघडण्याची तयारी सुरू आहे. शुक्रवारी देशात केवळ संसर्ग झाल्याचे नऊ रुग्ण आढळले. हे सर्व संक्रमित लोक परदेशातून आले आहेत. सध्या देशात कोविड-19 च्या 288 रूग्णांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत आणि 361 लोकं आयसोलेशनमध्ये आहेत.