Coronavirus Update: कोरोना व्हायरसचा कहर; जगभरातील मृतांचा आकडा 20 हजार पार

कोरना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून (Global Death Toll Passes) अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या 190 हून अधिक देश कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत.

चीनमध्ये जन्मलेल्या कोरोना व्हायरसने (Coronavirus) संपूर्ण जगात थैमान घातला आहे. कोरना व्हायरसची लागण होऊन आतापर्यंत 20 हजारांहून (Global Death Toll Passes) अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, 4 लाखांहून अधिक लोकांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. सध्या 190 हून अधिक देश कोरोना व्हायरसचा सामना करत आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी अधिक देशाने लॉकडॉऊनचा मार्ग निवडला आहे. यात भारताचाही समावेश आहे. महत्वाचे म्हणजे, कोरोना प्रतिबंधक औषधाचा शोध न लागल्याने मृतांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. यामुळे नागरिकांमध्ये भितीजनक वातावरण निर्माण झाली आहे. सध्या चीन येथे कोरोनाबाधीत रुग्णांच्या संख्येत घट झाली असून तेथील परिस्थिती आता नियंत्रणात आली असल्याचे बोलले जात आहे.

कोरोना व्हायरसने संपूर्ण जगभरात थैमान घातला असून आतापर्यंत 20 हजार 334 लोकांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसची लागण होऊन युरोपमध्ये 13 हजार 581 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात चीननंतर इटलीमध्ये सर्वाधिक 7 हजार 503 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर, स्पेन मध्ये 3 हजार 434 लोकांचा मृत्यू झाला आहे. सध्या चीन येथील मृतांची संख्या मंदावली असून तेथील मृतांची संख्या 3 हजार 281 वर आहे. कोरोना व्हायरसने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी स्पेन, इटली यांनीही लॉकडॉऊनचा पर्याय निवडला आहे. ज्या लोकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी आहे, अशी लोकांना कोरोनाची लगेच लागण होते असेही म्हटले जात आहे. इटलीमध्ये वृद्धांची संख्या अधिक असल्यामुळे तेथील कोरोबाधीत रुग्णांच्या मृत्यूत वाढ होऊ लागली आहे. हे देखील वाचा- Coronavirus वर उपचार म्हणून वृद्ध दांपत्याने केले डोनाल्ड ट्रंप यांनी दावा केलेल्या औषधाचे सेवन; पतीचा मृत्यू, पत्नीची स्थिती गंभीर

सध्या भारतावरही कोरोना व्हायरसचे संकट वावरताना दिसत आहे. कोरोना बाधीत रुग्णांच्या आकडेवारी झपाट्याने होणारी वाढ असल्याने भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसाचा लॉकडाऊन घोषीत केला आहे. दरम्यान या कालावधीत घराबाहेर पडणाऱ्या लोकांवर कारवाई करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.