Colombia to Recovered Shipwreck from Sea: कोलंबियातील समुद्रातून बाहेर काढले जाणार 315 वर्षांपूर्वी बुडालेले जहाज; होता 1.66 लाख कोटी रुपयांचा 200 टन खजिना, 4 देशांनी केला दावा

त्यावेळी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांनी या शोधाचे वर्णन मानवी इतिहासातील सर्वात मौल्यवान खजिना असे केले होते.

Colombia to Recovered Shipwreck from Sea (संग्रहित संपादित प्रतिमा)

कोलंबिया (Colombia) सरकारने कॅरेबियन समुद्रात (Caribbean Sea) 315 वर्षांपूर्वी बुडालेले जहाज परत मिळवण्याचा निर्णय घेतला आहे. असे मानले जाते की बुडण्यापूर्वी सॅन जोस (San José) नावाच्या या जहाजावर सोने आणि चांदीसह 1 लाख 66 हजार कोटी डॉलर्सचा 200 टन खजिना होता. हे जहाज 1708 मध्ये राजा फिलिप V च्या ताफ्याचा भाग होता. स्पेन जिंकण्याच्या युद्धात ब्रिटिश नौदलाने केलेल्या हल्ल्यात सॅन जोस जहाज बुडाले होते. त्यावेळी जहाजावर 600 लोक होते, त्यापैकी फक्त 11 लोकच जिवंत राहू शकले.

काही वर्षांपूर्वी 2015 मध्ये कोलंबियन नौदलाच्या काही लोकांना जहाजाचे अवशेष 31 हजार फूट पाण्याखाली सापडले होते. त्यावेळी कोलंबियाचे राष्ट्राध्यक्ष जुआन मॅन्युएल सँटोस यांनी या शोधाचे वर्णन मानवी इतिहासातील सर्वात मौल्यवान खजिना असे केले होते. या जहाजाच्या अवशेषांवरून स्पेन, कोलंबिया आणि बोलिव्हियाच्या काही लोकांमध्ये वाद सुरू आहे. बोलिव्हियन समुदायाचा दावा आहे की, त्यांच्या लोकांना खजिना खनन करण्यास भाग पाडले गेले. या कारणास्तव हा खजिना त्यांचाच आहे.

याशिवाय ग्लोका मोरा नावाच्या अमेरिकन रेस्क्यू असोसिएशनने देखील 1981 मध्ये हे जहाज सापडल्याचा दावा केला होता. ग्लोका मोरा यांनी सांगितले की, त्यांनी अर्धा खजिना फेडरेशनकडे राहील याच अटीवर कोलंबियन सरकारला जहाजाच्या दुर्घटनेचे ठिकाण सांगितले होते. मात्र कोलंबियाने 2015 मध्ये सांगितले की, त्यांच्या नौदलाने स्वतःच्या प्रयत्नातून दुसर्‍याच ठिकाणी जहाजाहाचे अवशेष शोधून काढले. आता अध्यक्ष गुस्तावो पेट्रो यांना 2026 मध्ये त्यांचा कार्यकाळ संपण्यापूर्वी हे अवशेष बाहेर काढायचे आहेत.

पेट्रो सरकारने सांगितले की ते या अवशेषांसाठी एक प्रयोगशाळा तयार करणार आहे, जिथे ते साफ केल्यानंतर जहाजाबाबत अभ्यास केला जाऊ शकतो. त्यानंतर या गोष्टी राष्ट्रीय संग्रहालयात ठेवण्यात येणार आहे. गेल्या वर्षी नौदलाने या दुर्घटनेशी संबंधित अनेक छायाचित्रे गोळा केली होती. त्यावेळी समुद्री प्राण्यांमध्ये जहाजाच्या दुर्घटनेसोबत सोन्याची नाणी, विटा आणि काही मौल्यवान भांडी आढळली होती. या सगळ्यामध्ये डॉल्फिनचे ठसे असलेल्या बंदुका होत्या, ज्याद्वारे अवशेष ओळखता आले. सॅन जोस हे 62 तोफा, तीन मास्ट असलेले गॅलियन होते जे 8 जून 1708 रोजी 600 जणांसह बुडाले. 16व्या-18व्या शतकात युरोप आणि अमेरिका दरम्यान प्रवास करणाऱ्या जहाजांपैकी हे जहाज होते. बुडाण्यापूर्वी हे जहाज अमेरिकेतून स्पेनला खजिना घेऊन जात होते. स्पेन हा खजिना ब्रिटनविरुद्धच्या युद्धात वापरणार होता. (हेही वाचा: Israel to Hire 1 Lakh Indian Workers: इस्रायल देणार तब्बल 1 लाख भारतीयांना नोकऱ्या; पॅलेस्टिनींना देशातून हुसकावून लावण्याची योजना, जाणून घ्या सविस्तर)

सॅन जोस गॅलियन पोर्टोबेलो, पनामा येथून 14 जहाजे आणि तीन स्पॅनिश युद्धनौकांच्या ताफ्याचे नेतृत्व करत रवान झाले होते. पुढे त्याचा सामना एका ब्रिटिश स्क्वाड्रनशी झाला. 8 जून 1708 रोजी रॉयल नेव्हीचे इंग्लिश कमोडोर चार्ल्स वेजर यांनी कार्टाजेनापासून 16 मैलांवर बारूजवळ या जहाजाचा माग काढला. यानंतर जहाज आणि त्यातील सर्व सामान ताब्यात घेण्याचे ठरले. पण सॅन जोसच्या जहाजावर स्फोट झाला, ज्यामुळे जहाज ताब्यात घेण्यापूर्वीच बुडाले. ब्रिटिश सरकारने स्पॅनिश ताफ्याला हा खजिना युरोपात नेण्याची परवानगी दिली नाही.