चीनच्या सर्वात श्रीमंत महिला झू कुनफेईचे डोनाल्ड ट्रम्पमुळे 5000 कोटींचं नुकसान

झू कुनफेईप्रमाणेच अलीबाबा ग्रुपचे संस्‍थापक जॅक मा आणि टेनशेट हॉल्डिंग्‍सचे सीईओ मा हुतेंग यांचेही अमेरिका-चीन दरम्यानच्या ट्रेडवॉरमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

झू कुनफेई Photo Credit: Twitter

भारत- चीनदरम्यान सुरू असलेल्या ट्रेडवॉरचा फटका अनेकांना बसला आहे. ट्रेड वॉरमुळे चीनची सर्वात श्रीमंत महिला झू कुनफेईच्या संपत्तीमध्ये 66% घट झाली आहे. जगातील 500 सर्वात श्रीमंत चीनी उद्योगपतींचे आजतागायत सुमारे 86 अरब डॉलरचं नुकसान झालं आहे.

झू कुनफेई नेमकी कोण ?

झू कुनफेईची लेन्स टेक्नॉलॉजी कंपनीची मालकीण आहे. तिच्या कंपनीद्वारा अॅप्पल आणि टेस्ला यांच्यासाठी टचस्क्रीन बनवली जाते. ट्रेड वॉरदरम्यान लेन्स टेक्नॉलॉजीच्या शेअर्समध्येही यंदा ६२ टक्क्यांनी घट झाली आहे. झू कुनफेईचा जन्म १९७० साली हुनान प्रांतातील शियांगमध्ये झाला. स्वतःची कंपनी सुरू करण्यापूर्वी त्यांनी सहा वर्ष एका ग्लास फॅक्टरीमध्ये काम केलं होतं.

चीनचं मोठ नुकसान

अमेरिकेने त्यांच्या व्यापार नीतींमध्ये बदल केल्याने त्याचा सगळ्यात मोठा फटका चीनला बसला आहे. अनेक चीनी कंपन्या अमेरिकन टेक कंपन्यांना कच्चा माल पुरवतात.

झू कुनफेईप्रमाणेच अलीबाबा ग्रुपचे संस्‍थापक जॅक मा आणि टेनशेट हॉल्डिंग्‍सचे सीईओ मा हुतेंग यांचेही मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.