भारतासाठी धोक्याचे संकेत, चीन समुद्रात पसरतोय लष्करी हातपाय

कारण, काही महिन्यांपूर्वीच मलेशियाने भारतासोबतही संयुक्त युद्धसराव केला होता.

(संग्रहित, संपादित आणि प्रतिकात्मक प्रतिमा)

'तुम्ही स्वत:ला बदलू शकता, शेजारी नव्हे', माजी पंतप्रधान दिवंगत अटलबीहारी वाजपेयी यांचे हे वाक्य बरेच काही सांगून जाते. भारताच्या शेजारील राष्ट्रांबाबत बोलताना अटलबीहारींनी हे वाक्य वापरले होते. दरम्यान, चीन आणि पाकिस्तानबाबत सध्या भारतासाठी हे वाक्य तंतोतंत खरे ठरते. खास करुन चीनसाठी. चीनसोबत आपले संबंध सौहादपूर्ण ठेवण्याचे भारत नेहमीच प्रयत्न करतो. मात्र, तरीही डोकलामसारखा संघर्ष उभा ठाकतो. डोकलाम संघर्ष सध्या कमी झाला असला तरी, पूर्ण निवळला नाही. दरम्यान, चीनने पुन्हा एकदा आपली विस्तारवादी चाल खेळत भारताला घेरण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. या वेळी चीनने हा प्रयत्न भूभागावरुन नाही तर, समुद्रातून जलमार्गे सुरु केला आहे. चीन आणि भारताचे सैन्य समुद्रातून आमनेसामने येण्याची शक्यता आहे. त्यातच मलेशीयाने चीनला सहकार्य केल्याने भारताला झटका बसला आहे. अशा परिस्थीतीत भारतासाठी हे धोक्याचेच संकेत आहेत.

भारताची युद्धसरावावर बारीक नजर

चीन येत्या शनिवरपासून ९ दिवसांचा संयुक्त नौसैना युद्धसराव सुरु करत आहे. चीनच्या संरक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा युद्धसराव थायलंड आणि मेलेशियासोबत केला जाईल. उघडच आहे की, चीन हा सराव आपल्या नौसेनेची ताकद मजबूत करण्यासाठी करत आहे. अर्थात, चीनच्या या हालचालींवर भारताचीही बारीक नजर आहे. हा युद्धसराव स्ट्रेट ऑफ मलाक्का येथे होणार आहे. ही जागा मलेशियापासून निकोबार द्वीपच्या सुमारे एक हजार किलोमीटर दूर अंतरावर आहे. इथे भारतीय नौसेनेचे एक एअर स्टेशनही आहे. (हेही वाचा, एक राऊंड 36 वार: भारत-रशिया S-400 खरेदी करार: काय आहेत वैशिष्ट्ये?)

मलेशियाचे चीनसोबत युद्धसराव करणे हा भारतासाठी मोठा धक्का मानला जात आहे. कारण, काही महिन्यांपूर्वीच मलेशियाने भारतासोबतही संयुक्त युद्धसराव केला होता. या युद्धसरावामुळे मलेशिया आणि अशियातील इतर देशांसोबत भारताचे संबंध अधिक दृढ होतील, अशी चर्चा सुरु होती. मात्र, तोपर्यंतच मलेशीयाने चीनसोबत युद्धसराव करण्याचा घाट घातल्याने या चर्चा जागेवर थांबल्या आहेत.

युद्धसरावाच्या निमित्ताने लष्करी ताकद दाखवण्याचा प्रयत्न

या युद्धसरावाच्या निमित्ताने चीन आपली लष्करी ताकद दाखवू पाहतो आहे. या युद्धसरावासाठी चीन दोन युद्धनौकांवरुन उड्डान घेणारी हेलिकॉप्टर्स, 3 IL-76 ट्रान्सपोर्ट एअरक्राफ्टआणि तीन वेगळ्या युद्धपद्धती वापरु शकतो. ९ दिवस चालणाऱ्या या युद्धसरावासाठी सुमारे ६९२ जवान उतरु शकतात. चीनने या युद्धसरावासाठी 'पीस अॅण्ड फ्रेंण्डशीप २०१८' असे नाव दिले आहे. चीनच्या समुद्री क्षेत्रात शांतता आणि स्थिरता कायम ठेवण्याासाठी हा युद्धसराव केला जात असल्याचे चीनने म्हटले आहे.

दरम्यान, युद्धसरावासाठी निवडलेली जागा मलेशिया, इंडोनेशिया आणि थायलंडला जोडते. ही जागा दक्षिण चीनच्या हद्दीत येत नसल्याचा दावा प्रसारमाध्यमांनी केला आहे. दरम्यान, अंदमान समुद्र आणि दक्षिण चीनला ही जागा जोडत असल्याचे प्रसारमाध्यमांनी आपल्या वृत्तात म्हटले आहे. सुमारे ५०० मैलांचे असलेले हे अंतर एक महत्त्वपूर्ण व्यापारी जलमार्ग आहे. भारत आणि अशीयातील अनेक प्रमुख देश आणि चीनी व्यापारी जहाजे या मार्गावरुन ये जा करतात. धोक्याचा संकेत असा की, ज्या ठिकाणी चीन जास्त काळ उपस्थिती दर्शवतो त्या ठिकाणावर चीन कालांदराने आपला दावा सांगतो. फिलिपीन्स आणि व्हियेतनामच्या काही ठिकाणांसोबत असे घडले आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif