बॉलिवूड आणि भारतीय हिंदी मालिकांवर पाकिस्तानमध्ये बंदी

मात्र आता भारतीय चित्रपट आणि हिंदी मालिकांवर बंदी घालण्यात आली आहे.

चित्रपट (फोटो सौजन्य- Pixabay)
पाकिस्तानात दहशतवादी चित्रपट आणि कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली होती. मात्र आता भारतीय चित्रपट आणि हिंदी मालिकांवर बंदी घालण्यात आली आहे.
युनायटेड प्रोड्यूसर्स असोशिएशनने सर्वोच्च न्यायालयात विदेशी मालिका आणि चित्रपटांबर बंदी घालण्याची याचिका न्यायालयामध्ये दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर सुनावणी करताना न्यायाधीशांनी भारतावर टिका केली. तसेच त्यांनी भारताने सिंधू नदीवर धरण बांधण्यास विरोध केला होता. त्यामुळे आता पाकिस्तानात भारतीय चित्रपट आणि हिंदी मालिकांवर बंदी घालण्यात आली आहे असे न्यायाधीशांनी सांगितले.
पाकिस्तानच्या या निर्णयामुळे पाकिस्तानातील बॉलिवूड प्रेमींना धक्का बसला आहे. तर पाकिस्तानात पॅडमॅन, टायगर जिंदा है, बेबी, नाम शबाना आदी चित्रपटांवर बंदी घालण्यात आली आहे.