Barbara Jabarica हिने मेहुल चोकसी याची गर्लफ्रेंड नसल्याचे स्पष्ट करत केले 'हे' मोठे धक्कादायक खुलासे

त्याचसोबत अपहरणाप्रकरणी सुद्धा तिने नकार देत असे म्हटले की, कोणीही मला संपर्क केला नव्हता.

Mehul Choksi and Barbara Jabarica (Photo Credits-Twitter)

मेहुल चोकसी (Mehul Choksi)  याची गर्लफ्रेंड असल्याचे बाबरा जबैरिका (Barbara Jabarica)  हिने बुधवारी नकार दिला आहे. त्याचसोबत अपहरणाप्रकरणी सुद्धा तिने नकार देत असे म्हटले की, कोणीही मला संपर्क केला नव्हता. अपहरणासारखे काहीच नाही. मी काही मुलाखतीत सुद्धा म्हटले की, जी लोक जॉली हार्बर परिसरातील आहेत त्यांना माहिती आहे की, कोणाचेही अपहरण अशक्य आहे. कारण हा परिसर अत्यंत सुरक्षित आहे. बारबरा हिला विचारण्यात आले की, मेहुल चोकसी याच्या व्यतिरक्त अन्य कोणत्या भारतीयाने तिला संपर्क केला होता की नाही.

डोमिनिका हायकोर्टात मेहुल चोकसी याच्या जामिनावर सुनावणी करण्यास 11 जून पर्यंत स्थगिती दिली आहे. बारबरा हिने म्हटले की, मी आधीच सांगितले त्याची गर्लफ्रेंड नव्हती. माझा स्वत:चा व्यवसाय आहे. मला कोण्याच्या पैशासह समर्थन, हॉटेल बुकिंग किंवा दागिन्यांची गरज नाही आहे.(Mehul Choksi PNB Scam: भारताला मोठा झटका, डोमिनिका HC चा मेहुल चोकसी याच्या प्रत्यार्पणासाठी नकार)

Tweet:

बारबरा यांनी म्हटले की, मी युरोपातील आहे आणि येथेच राहते. भारतातील बातम्या आणि घटना मी पाहत नाही. आरोपी, फसवणूकदार यांच्या लिस्टबद्दल ही मला काही वाटत नाही. यासाठीच मी मेहुल चोकसी याला ओळखत नाही. त्याचसोबत त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाबद्दल ही गेल्या आठवड्यापर्यंत मला माहिती नव्हते. माझे असे म्हणणे आहे की, अँटीगुआ मध्ये त्याच्याबद्दल कोणालाच माहिती नाही.(मेहुल चोकसी आपल्या गर्लफ्रेंडला घेऊन डोमिनिकामध्ये रोमँटिक सहलीला गेला असता त्याला अटक झाली असावी- Antiguan Prime Minister)

Tweet:

बारबरा हिने म्हटले की, मी हे फोटो पाहिले की तो आधी कसा दिसायचा. आता मला असे वाटते की, त्याचे वजन अत्यंत कमी झाले असून वेगळा दिसतो. मला वाटत नाही की, कॅरिबिया मध्ये आलेला कोणताही व्यक्ती त्याला ओळखू शकत नाही की तो मेहुल चोकसी आहे.

दरम्यान, बारबरा हिने यापूर्वी म्हटले होते की ती त्याची मैत्रीण आहे. मेहुल चोकसी याने त्याचे खोटे नाव राज सांगत त्याच्यासोबत मैत्री केली होती. पंजाब नॅशनल बँकेत घोटाळा करुन भारतून परेदशात पळ काढल्यानंतर तो आता डोमिनिका पोलिसांच्या ताब्यात आहे. चोकसी याने स्वत:च्या अपहरणाबद्दल आरोप लावत त्यात बारबरा हिचे सुद्धा नाव घेतले होते.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif