Albert Einstein ने लिहिलेल्या प्रसिद्ध E=mc2 सूत्राच्या पत्राचा लिलाव; कोट्यावधी रुपयांना विकले गेले हस्तलिखित
या सिद्धांताद्वारेच आईन्स्टाईन यांनी प्रथम ऊर्जा आणि वस्तुमान यांचे संबंध स्पष्ट केले होते. आईनस्टाईन यांनी आयुष्यात केवळ चार वेळाच कागदावर हा सिद्धांत लिहिला होता.
जगातील महान शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन (Albert Einstein) यांचे एक हस्तलिखित पत्र संपूर्ण जगभर चर्चेचा विषय ठरले आहे. हे कोणते साधेसुधे पत्र नसून अल्बर्ट आइनस्टाईन यांचे हे ते पत्र आहे ज्यावर त्यांनी E = mc2 लिहिले आहे. थिअरी ऑफ रिलेटिव्हिटीचा निर्माता आणि जगातील थोर शास्त्रज्ञ अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी आयुष्यात फक्त चार 4 वेळाच E = mc2 लिहिले. आता त्यातील एका हस्तलिखिताचा लिलाव झाला आहे. हे पत्र 1.2 मिलिअन डॉलर्स, म्हणजेच जवळजवळ 8,74,92,600 कोटी रुपयांना विकले गेले आहे. बोस्टनस्थित आरआर ऑक्शनने शुक्रवारी याबाबत माहिती दिली.
E = mc2 हा गणित आणि विज्ञान जगातील सर्वात महत्वाचा आणि सुप्रसिद्ध सिद्धांत मानला जातो. या सिद्धांताद्वारेच आईन्स्टाईन यांनी प्रथम ऊर्जा आणि वस्तुमान यांचे संबंध स्पष्ट केले होते. आईनस्टाईन यांनी आयुष्यात केवळ चार वेळाच कागदावर हा सिद्धांत लिहिला होता. आईन्स्टाईन यांचे हे पत्र त्यांच्या खासगी संग्रहात ठेवले होते. काही दिवसांपूर्वी त्यातील एक पत्र सार्वजनिक करण्यात आले होते. अशी अपेक्षा केली गेली होती की, आइन्स्टाईनच्या या ऐतिहासिक पत्राला सुमारे 4 लाख डॉलर्स किंमत मिळू शकेल.
मात्र आता हे पत्र 12 लाख डॉलर्सना विकले गेले आहे. 13 मे रोजी 5 जणांनी आइन्स्टाईन यांचे पत्र विकत घेण्यासाठी बोली लावायला सुरुवात केली. या पत्राची किंमत 7 दशलक्ष डॉलर्स होईपर्यंत बोली लावण्यात आली. त्यानंतर मात्र तीन जणांनी लिलावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर उर्वरित दोघांनी या आठवड्यापर्यंत आइनस्टाइनच्या पत्रासाठी बोली लावली. शेवटी आईन्स्टाईन यांचे हे पत्र जवळजवळ 9 कोटी रुपयांना विकले गेले. (हेही वाचा: शास्त्रज्ञांनी शोधून काढली जगातील पहिली गर्भवती ममी; 2000 वर्षांपासून गर्भ पोटातच आहे)
अल्बर्ट आइनस्टाईन यांचे हे ऐतिहासिक पत्र त्यांनी 26 ऑक्टोबर 1946 रोजी अमेरिकन शास्त्रज्ञ लुडविक सिल्बर्स्टाईन यांना लिहिले होते. लुडविक सिल्बर्स्टाईन एक प्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ होते, ज्यांनी आइनस्टाइनच्या सिद्धांताला आव्हान दिले. हे पत्र आइन्स्टाईन यांनी जर्मन भाषेत लिहिले होते.