युंगांडात मुसळधार पाऊस, भूस्खलनात ४१ लोक ठार

त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही लोकांच्या शरीराचे वेगवेगळे आवयव हाती लागत आहेत.

(संग्रहित आणि प्रतिकात्म प्रतिमा)

पूर्व युगांडात कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे नदीला महापूर आला. त्यातच काही ठिकाणी भूस्खल झाल्याने मोठी जीवित आणि वित्त हानी झाली आहे. भूस्खलनामुळे आतापर्यंत सुमारे ४१ लोक ठार झाले आहेत. हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. अपत्ती निवारन व्यवस्थापन अधिकारी मार्टीन ओवोर यांनी सागितले की, 'बचाव आणि मदतकार्य सुरु असून, पीडितांना स्थलांतरीत करण्यात येत आहे. सरकारने लष्कर आणि बचावकार्य करणाऱ्या पथकाला पीडित परिसारात तैनात केले आहे.

पूर्व युगांडातील बुड्डा जिल्ह्यात एक दिवसांपूर्वी मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे नदीला महापूर आला काही ठिकाणी जमीन मोठ्या प्रमाणावर खचली. यात अनेकांचे प्राण गेले. आतापर्यंत हाती आलेल्या मृतांचा आकड ४१ असला तरी, अद्यापही मातीच्या ढीगाऱ्याखाली अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे हा आकडा आणखी वाढू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे. काही लोकांच्या शरीराचे वेगवेगळे आवयव हाती लागत आहेत.

दरम्यान, चिखल, दुर्गंधी आणि अधूनमधून येणारा पाऊस यांमुळे मदतकार्यात अडथळा येत आहे.