Akshata Murthy या Queen Elizabeth पेक्षा श्रीमंत; पहा Infosys च्या नारायण मूर्तींच्या लेकीची संपत्ती किती?
तशीच ऋषि सुनक यांची संपत्ती देखील अंदाजे 2 हजार कोटींच्या आसपास आहे.
अक्षता मूर्ती (Akshata Murthy) म्हणजेच इंफोसिसच्या नारायण मूर्ती (Narayan Murthy) यांची लेक आणि ब्रिटनचे वित्त मंत्री ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी यांची संपत्ती ब्रिटनची महाराणी एलिझाबेझ || (Queen Elizabeth) पेक्षा अधिक असल्याचं वृत्त समोर आलं आहे. इंफोसिस चे 0.91 % शेयर अक्षता मूर्ति यांच्याकडे आहेत. त्याची किंमत अंदाजे 4300 कोटी सांगितली जात आहे. गार्डियनचा वृत्तनुसार, अक्षता मूर्ती यांची संपत्ती GBN 480 मिलियन आहे. तर राणी एलिझाबेझ यांची खाजगी संपत्ती GBN 350 मिलियन आहे. अक्षता आणि राणी एलिझाबेझ यांच्या संपत्तिमध्ये सुमारे GBN 100 मिलियन पेक्षा अधिक फरक आहे.
सध्या ब्रिटन मध्ये अर्थमंत्री ऋषी सुनक यांनी आपल्या संपत्तीचं पूर्ण विवरण सादर न केल्याचे सांगत त्यांचं नाव चर्चेमध्ये आहे. मीडीया रिपोर्ट्सनुसार, सुनक यांनी जाहीर केलेल्या आर्थिक संपत्तीच्या दाखल्यामध्ये केवळ अक्षता या लंडन मधील Catamaran Ventures च्या मालकीण असल्याचं सांगण्यात आलं आहे. ब्रिटीश मीडियाच्या माहितीनुसार, इंफोसीस व्यतिरिक्त अक्षता अन्य काही कंपन्यांमध्ये डिरेक्टर पदी आहे. तशीच ऋषि सुनक यांची संपत्ती देखील अंदाजे 2 हजार कोटींच्या आसपास आहे. ते ब्रिटन मधील सर्वात श्रीमंत खासदारांपैकी एक आहेत. Infosys ची आतापर्यंतची सर्वात मोठी डील; 1.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार अमेरिकन कंपनी Vanguard.
अक्षता मूर्ती आणि ऋषी सुनक यांचं लग्न 2009 साली झालं आहे. दोघांची ओळख स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकताना झाली होती. त्यानंतर त्यांच्या मैत्रीचं रूपांतर प्रेमात आणि पुढे लग्नात झालं. ऋषि सुनक यांची आई 60च्या दशकामध्ये पूर्व आफ्रिकेमधून ब्रिटन मध्ये स्थलांतरित झाली होती. ऋषि आणि अक्षता यांना 2 मुलं आहेत.