विमान अपघात : रनवेऐवजी थेट पाण्यात घुसलं विमान, 47 प्रवाशांना बचावण्यात यश

चूक इंटरनॅशनल एअरपोर्टवर Boeing 737-800 हे विमान रन वे पासून सुमारे 160 मीटर पुढे आल्याने अपघात

अपघातग्रस्त विमान (Photo Credit- Facebook)

Boeing 737-800 हे पापुआ न्यू गिनी देशाचं विमान मायक्रोनेशिया जवळच्या एका आयलॅंडमध्ये थेट पाण्यात कोसळले आहे. 189 प्रवाशांची क्षमता असलेल्या या विमानात अपघाताच्या वेळी 36 प्रवासी आणि 11 क्रु मेंबर्स होते. सुरक्षारक्षकांच्या मदतीने विमानातील सार्‍या प्रवाश्यांना आणि कामगारांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आलं आहे.

सोशल मीडियावर चर्चा

चूक इंटरनॅशनल एअरपोर्टवर Boeing 737-800 हे विमान रन वे पासून सुमारे 160 मीटर पुढे आले होते. हे विमान सकाळी 9.30 वाजता लॅन्ड होणं अपेक्षित होतं. मात्र हे रनवे न उतरता थेट पाण्यात घुसलं.

अपघातग्रस्त विमानाचे व्हिडिओ आणि फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पॅसिफिक आयलंड,मायक्रोनेशिया येथे हे विमान कोसळले आहे.

एअरपोर्ट जवळ असणार्‍या हॉटेल्सच्या काही कर्मचार्‍यांनी हा प्रकार बघितला. त्यानंतर तात्काळ स्थानिकांनी होड्यांच्या मदतीने विमानाजवळ पोहचून मदतकार्याला सुरूवात केली. सुरक्षित बचावलेल्या प्रवाशांना आणि कर्मचार्‍यांना नजिकच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.



00" height="600" layout="responsive" type="mgid" data-publisher="bangla.latestly.com" data-widget="1705935" data-container="M428104ScriptRootC1705935" data-block-on-consent="_till_responded"> @endif