Xiaomi स्मार्टफोनमध्ये होणार मोठा बदल, 'हे' महत्वाचे फिचर वापरता येणार नाही
एमआय 9 टी प्रो वगळल्यास कंपनीच्या उर्वरित फोनमध्ये एमआययूआय इंटरफेस आहे आणि अॅप्सपासून नोटिफिकेशन्सपर्यंत वेगळा अनुभव मिळतो.
शाओमीचे स्मार्टफोन त्यांच्या कस्टम इंटरफेस एमआययूआयवर काम करतात. एमआय 9 टी प्रो वगळल्यास कंपनीच्या उर्वरित फोनमध्ये एमआययूआय इंटरफेस आहे आणि अॅप्सपासून नोटिफिकेशन्सपर्यंत वेगळा अनुभव मिळतो. पण आता एक मोठा बदल होणार आहे. शाओमीने त्यांच्या फोरम मध्ये असे सांगितले की, Mi 9T Pro नंतर लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये गुगल डायलर (Google Dialler) आणि गुगल मेसेजेस पेक्षा कमी असणार आहे.
गिजमोचाइना यांनी दिलेल्या वृत्तानुसार शाओमीमध्ये हा बदल जगभरात लॉन्च करण्यात आलेल्या स्मार्टफोनमध्ये होणार आहे. म्हणजेच चायना यांच्या बाहेरील शाओमीचे जेवढे स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत त्यात गुगल मेसेज आणि डायलर दिले जाणार आहे. हा निर्णय कंपनीने स्मार्टफोन वापरणाऱ्या युजर्ससाठी घेतला असल्याचे म्हटले आहे.(Year Ender 2019: या वर्षातील सर्वाधिक Hit ठरलेले 'Top 5' Apps)