World Radio Day 2019: यंदा 'वर्ल्ड रेडिओ डे'च आठवं सेलिब्रेशन, पहा 13 फेब्रुवारी हा दिवस कसा ठरवण्यात आला?

13 फेब्रुवारी हा दिवस World Radio Day म्हणून साजरा केला जातो. यंदा “Radio: Dialogue, Tolerance, and Peace” या थीमवर जगभरात सेलिब्रेशन सुरू आहे.

रेडियो (Photo Credits: Pixabay)

8th World Radio Day : शॉर्ट व्हेव्ह्स पासून सुरू झालेला रेडिओचा हा प्रवास आता एफएम चॅनल्सपर्यंत येऊन ठेपला आहे. जगभरात लोकांना कनेक्टेड ठेवण्यासाठी रेडिओने मोठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. भारतामध्ये स्वातंत्र्यलढ्यापासून ते आज अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या मन की बात (Mann Ki Baat) या कार्यक्रमापर्यंत रेडिओची जादू टिकून आहे. रेडिओचं हेच महत्त्व ओळखून आठ वर्षांपासून जगभरात 'वर्ल्ड रेडिओ डे' साजरा केला जातो. 13 फेब्रुवारी हा दिवस World Radio Day म्हणून साजरा केला जातो. यंदा “Radio: Dialogue, Tolerance, and Peace” या थीमवर जगभरात सेलिब्रेशन सुरू आहे. पण रेडिओ डे सेलिब्रेशनची सुरूवात कधी, कुठे, कशी झाली? याची कहाणीदेखील तितकीच इंटरेटिंग आहे.

World Radio Day सेलिब्रेशनच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी

आज डिजिटलायझेशनचा जमाना आहे. या काळात जगाच्या टोकावर कुठेही बसून रेडिओ इंटरनेटच्या माध्यमातूनही ऐकण्याची सोय खुली करण्यात आली आहे.