'व्हॉट्सअॅप'वर लवकरच सुरू होणार Forwarding Info Feature
वाढत्या फेकन्यूजच्या (Fake News) जाळ्यामध्ये युजर्स अडकू नयेत म्हणून सध्या व्हॉट्सअॅपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
युजर्सना आकर्षित करण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp) सतत नवनवीन अपडेट्स घेऊन येत असते. यामध्ये आता एखादा मेसेज किती वेळेस फॉरवर्ड करण्यात आला आहे याची माहिती देणारं नवं फीचर जोडण्यावर सध्या व्हॉट्सअॅपकडून काम सुरू आहे. वाढत्या फेकन्यूजच्या (Fake News) जाळ्यामध्ये युजर्स अडकू नयेत म्हणून सध्या व्हॉट्सअॅपकडून विशेष प्रयत्न सुरू आहेत.
WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हॉट्सअॅप बीटाच्या iOS version 2.19.40.23 आणि
Android version 2.19.86 मध्ये हे फीचर उपलब्ध आहे. इतर व्हॉटसअॅप युजर्सकडून एखादा मेसेज किती वेळा फॉरवर्ड करण्यात आला आहे याची माहिती मिळणार आहे. मेसेज इंफो सेक्शनमध्ये मेसेज फॉरवर्डची माहिती मिळेल. Android युजर्ससाठी Whatsapp चे नवे 'डार्क मोड' फिचर लवकरच होणार सादर; पहा काय आहे खासियत
WABetaInfo ट्विट
जर एखादा मेसेज Frequently Forwarded या टॅगसह आला असेल तर तो मेसेज कमीतकमी 4 वेळा फॉरवर्ड केलेला असेल. अंदाजे व्हॉट्सअॅपवर एका मिनिटाला सुमारे 4.1 कोटी मेसेज पाठवले जातात. सणाच्या वेळेस हे प्रमाण थोड अधिक असते. अद्याप व्हॉट्सअॅपकडून मेसेज फॉरवर्डच्या पर्यायाची माहिती कधीपर्यंत उपलब्ध होईल याची माहिती देण्यात आलेली नाही.