WhatsApp मध्ये दोन नवीन फिचर्स येणार, युजर्सच्या समस्या दूर होणार
तर व्हॉट्सअॅप खासकरुन ट्रेंडिग गोष्टींसंबंधित फिचर्स युजर्सला देण्याचा प्रयत्न करत असते.
सोशल नेटवर्किंगमध्ये युजर्सच्या पसंदीचे व्हॉट्सअॅप (WhatsApp) नेहमीच नवीन फिचर्स घेऊन येत असते. तर व्हॉट्सअॅप खासकरुन ट्रेंडिग गोष्टींसंबंधित फिचर्स युजर्सला देण्याचा प्रयत्न करत असते. त्यामुळे आता लवकरच व्हॉट्सअॅप मध्ये दोन नवे फिचर्स येणार आहेत. त्यामुळे युजर्सला व्हॉट्सअॅप संबंधित होणाऱ्या काही समस्या दूर होणार आहेत.
तर नव्या फिचर्समध्ये युजर्सला त्यांनी व्हॉट्सअॅपवर म्युट केलेल्या व्यक्तीचे स्टेटस तुम्हाला दिसणार नाही आहे. म्हणजेच Hide Muted Status असे या नव्या फिचर्सचे नाव असून म्यूट केलेले स्टेटस हाईड केले जाणार आहेत. या फिचर्समुळे युजर्सला फायदा होणार आहे. मात्र सध्या म्यूट केलेले स्टेटसुद्धा टॅबच्या खालच्या बाजूस दिसतात.
या फिचर्सची खासियत अशी आहे की, युजर्सला एका क्लिकवर हिडन स्टेटसचा ऑप्शन उपलब्ध होणार आहे. त्यानुसार तुम्हाला हाईड केलेल्या व्यक्तींची लिस्ट दिसणार आहे. परंतु अद्याप या फिचर्सवर काम केले जात आहे.(2020 पासून 'या' स्मार्टफोनमध्ये WhatsApp बंद होणार)
त्याचसोबत दुसरे नव्या फिचर्समध्ये व्हॉट्सअॅप युजर्स थेट त्यांचे स्टेटस फेसबुवर पोस्ट करु शकतात. तर मार्क झुकर्सबर्ग यांनी नुकतेच मॅसेंजर, व्हॉट्सअॅप आणि इंन्स्टाग्राम यांनी मिळून एक क्रॉस प्लॅटफॉर्म बनवण्याच्या तयारीत आहे.