WhatsApp Profile Photo कसा कराल हाईड; जाणून घ्या स्टेप्स

या फिचर्समुळे वापरकर्ते आपली प्राईव्हसी सेटींग करू शकता.

WhatsApp Logo (Photo Credits: Pixabay)

WhatsApp Profile Photo: बर्‍याचदा आपला मोबाईल नंबर काही अज्ञात लोकांपर्यंत पोहोचत असतो. आपण कार किंवा बस बुकिंग करण्यासाठी मोबाईलवरून पैसे देत असतो. त्यामुळे आपला मोबाईल नंबर इतर लोकांपर्यंत सहज पोहोचतो. परंतु, बर्‍याचदा लोक वैयक्तिक जीवनातील गोष्टी व्यावसायिकरित्या जोडलेल्या लोकांशी शेअर करत नाहीत. जसे की, व्हॉट्सअॅप प्रोफाइल आणि व्हॉट्सअॅप स्टेस्ट. तुम्ही जर तुमचा मोबाईल क्रमांक एखाद्या व्यक्तीला शेअर केला तर, ती व्यक्ती आपले व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल आणि व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस अॅक्सेस करू शकते. तसेच, आपल्या प्रोफाइल फोटोचा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा गैरवापरदेखील करू शकते. हे टाळण्यासाठी वापरकर्त्यांनी त्यांचा प्रोफाईल फोटो नेहमी हाईड ठेवावा. फोटो हाईड करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपद्वारे सिक्योरिटी फिचर उपलब्ध करुन देण्यात आले आहे. या फिचर्सच्या साहाय्याने वापरकर्ते कोणत्याही व्यक्तीस ब्लॉक न करता फोटो हाईड करू शकतात. (हेही वाचा - 1 जानेवारी पासून WhatsApp 'या' Android आणि iPhone ला सपोर्ट करणं बंद करतील)

व्हॉट्सअ‍ॅप प्रोफाइल फोटो कसा हाईड करायचा ?

व्हॉट्सअ‍ॅपने गेल्या काही वर्षात वापरकर्त्याच्या सुरक्षिततेसाठी अनेक नवीन फिचर्स लाँच केली आहेत. या फिचर्समुळे वापरकर्ते आपली प्राईव्हसी सेटींग करू शकता. त्यामुळे वापरकर्त्याला कोणत्याही अज्ञात व्यक्तीपासून त्रास होणार नाही. तसेच, वापरकर्त्याच्या गोपनीयतेस यामुळे कोणताही धोका उद्धभवणार नाही.